तरुण भारत

लंकेचा धमिका प्रसाद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

वृत्तसंस्था/ कोलंबो

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज 37 वर्षीय धमिका प्रसादने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. प्रसादने आपल्या 14 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत 25 कसोटी, 24 वनडे आणि एकमेव टी-20 सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व करताना एकूण 107 गडी बाद केले आहेत.

Advertisements

धमिका प्रसादने आपला शेवटचा कसोटी सामना 2015 साली विंडीजविरूद्ध खेळला होता. त्यानंतर लंकन क्रिकेट मंडळाने त्याला पुढील नऊ कसोटी सामन्यासाठी वगळले होते. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 41 गडी बाद केले आहेत. 2015 साली लंकेत झालेल्या भारताविरूद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रसादने 15 बळी मिळविले होते. धमिका प्रसादने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 29.1 धावांच्या सरासरीने 130 सामन्यात 351 बळी मिळविले आहेत. नवोदित क्रिकेटपटूंना संधी मिळावी यासाठी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचे प्रसादने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

Related Stories

आशियाई सांघिक टेटे चॅम्पियनशिपमध्ये भारताला कांस्यपदक

Patil_p

ते म्हणतात, 2011 वर्ल्डकप फायनल फिक्स होती!

Patil_p

आयर्लंडचा झिम्बाब्वेवर मालिका विजय

Patil_p

न्यूझीलंड क्रिकेटपटूंचे लंडनमध्ये आगमन

Patil_p

दिल्लीचा मुंबई इंडियन्सला पराभवाचा ‘शॉक’!

Patil_p

मेस्सी बार्सिलोनाच्या सरावात दाखल

Patil_p
error: Content is protected !!