तरुण भारत

महाराष्ट्रात कोरोना, सीमाभागात अलर्ट

वार्ताहर/ कोगनोळी

नजीकच्या महाराष्ट्रामध्ये गत चार दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सीमाभागाचे प्रवेशद्वार असलेल्या राष्ट्रीय महामार्ग चारवरील कोगनोळी टोलनाक्मयावर महाराष्ट्रातून येणाऱया सर्वच प्रवाशांची तपासणी करून कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. येत्या एक-दोन दिवसानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱया प्रवाशांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र हे 48 ते 72 तासांच्या आतील असणे आवश्यक आहे, अशी माहिती माहिती तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दिली.

Advertisements

 येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कोगनोळी टोलनाक्मयावर तहसीलदार कार्यालय विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यावतीने कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आशा कार्यकर्त्या व वैद्यकीय अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे.

 याठिकाणी निपाणी सर्कल अधिकारी अजित वंजोळे, बेडकिहाळ सर्कल अधिकारी संजय नेमन्नावर, तलाठी एस. एन. पोवार, तलाठी के. एल. पुजारी, कोगनोळी ग्रामविकास अधिकारी डी. बी. जाधव, निपाणी तालुका ग्रामसाहाय्यक एम. ए. मुल्ला, उमेश कोळी, एल. बी. पुजारी, बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी सलीम मुजावर, वरि÷ आरोग्य निरीक्षक आर. बी. पिंपळे, एम. डी. युसूफखान, आरोग्यसेविका ए. एस. मधाळे यांच्यासह आशा कार्यकर्त्या व कर्मचारी टोलनाक्मयावर तैनात करण्यात आले आहेत.

लक्षणे आढळल्यास प्रवाशांना माघारी पाठविणार

कोगनोळी टोलनाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया सर्व चारचाकी वाहनांसह इतर वाहनांमध्ये असलेल्या प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवाशांमध्ये कोणाला ताप, खोकला, सर्दी आदी लक्षणे आढळून आल्यास त्यांना माघारी पाठविण्यात येणार आहे, असेही तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले आहे.

Related Stories

जिलेटिनच्या भीषण स्फोटात पाच ठार

Amit Kulkarni

ऑटोनगर येथे कारखान्याला आग

Patil_p

वन्यप्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी भुयारी मार्ग करा

Amit Kulkarni

प्रस्थापित माजी नगरसेवकांना धक्का

Amit Kulkarni

जनावरांची बाजारपेठ खुली करा

Patil_p

चक्रीवादळाचा फटका बेळगावच्या विमानसेवेलाही

Amit Kulkarni
error: Content is protected !!