तरुण भारत

देशात 14,264 नवे बाधित, 90 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 14 हजार 264 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 90 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 09 लाख 91 हजार 651 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 56 हजार 302 एवढी आहे. देशात आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 1 कोटी 10 लाख 85 हजार 173 लोकांना लस देण्यात आली आहे.

शनिवारी 11,667 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 06 लाख 89 हजार 715 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 45 हजार 634 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

देशात आतापर्यंत 21 कोटी 09 लाख 31 हजार 530 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 06 लाख 70 हजार 050 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.20) करण्यात आल्या. 

Related Stories

दुबईतील रॉयल गोल्ड बिर्याणी

Patil_p

उत्तराखंड दुर्घटनेतील मृतांची संख्या 58 वर; अजूनही 146 बेपत्ता

datta jadhav

कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप

Omkar B

ट्रक्टर रॅलीत हस्तक्षेपास नकार

Patil_p

एक रुपयाच्या दंडाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Patil_p

दिल्ली : एका दिवसात सर्वाधिक 472 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8 हजार 470

pradnya p
error: Content is protected !!