तरुण भारत

कर्नाटकात पुन्हा लॉकडाऊन नाहीः मंत्री सुधाकर

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोविड -१९ च्या दुसर्‍या लाटेच्या भीतीमुळे लॉकडाऊन केला जाईल अशी चर्चा असताना राज्याचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के सुधाकर यांनी कर्नाटकमधील लॉकडाऊनची भीती फेटाळून लावली. शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी, सध्या राज्यात कोणत्याही भागात लॉकडाऊन होणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

मंत्री सुधाकर यांनी केलेल्या विधानाच्या अगोदर बेंगळूर महानगरपालिकेचे आयुक्त एन. मंजुनाथ प्रसाद यांनी म्हटले होते की, लोक कोविड -१९ च्या नियमांचे उल्लंघन करत राहिले तर पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो.

दरम्यान राज्यात कोरोनाची प्रकरणे केरळ किंवा महाराष्ट्र प्रमाणे इतक्या वेगाने वाढत नाहीत. पुन्हा लॉकडाऊन करण्यासारखी परिस्थिती नाही. राज्य सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव किंवा कल्पनादेखील नाही. मंत्री सुधाकर यांनी केरळ आणि महाराष्ट्र, विशेषतः सीमावर्ती जिल्हा आणि बेंगळूरसारख्या भागात परिस्थितीला रोखण्यासाठी राज्य सरकार खबरदारीच्या उपाययोजना करीत आहे, असे ते म्हणाले.

Advertisements

Related Stories

बेंगळूर हिंसाचार प्रकरणी सीसीबी पोलिसांकडून एसडीपीआय कार्यालयात शोध मोहीम

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री येडियुरप्पा सरकारचे नेतृत्व करतील

Abhijeet Shinde

लष्कराच्या इंजिनिअर्सनी 72 तासात गलवान नदीवर उभारला पूल

datta jadhav

केरळ : आरोग्यमंत्री शैलजा यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू

Abhijeet Shinde

कर्नाटक: केएसआरटीसीची हैदराबाद सेवा पुन्हा सुरू

Abhijeet Shinde

भारत दोन वर्षात टोलनाकामुक्त होणार

datta jadhav
error: Content is protected !!