तरुण भारत

गस्त म्हणजे टाळेबंदीनंतर मला मिळालेली संधी – मोनालिसा बागल

अभिनेत्री मोनालिसा बागल हिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली आहे. मोनालिसा लवकरच झी टॉकीज प्रस्तुत टॉकीज ओरिजिनल गस्त या चित्रपटातून 28 फेब्रूवारी रोजी दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटाविषयी मोनालिसा म्हणाली की, सुजाता नावाच्या एका गावकरी मुलीची भूमिका या चित्रपटात मी साकारली आहे. एका गावात गस्त घातली जातेय आणि त्या गावामध्ये ही मुलगी राहत आहे. सुजाता ही खूपच चंचल आहे आणि तिला अमर नावाच्या एका मुलावर प्रेम होतं. ती त्याला चोरुन चोरुन भटते आणि त्यांचं प्रेम कसं खुलत जातं हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. तानाजीसोबत काम करताना दडपण अगदी असं नव्हतं. कारण मी तानाजीसोबत ह्या आधी पण क्रिन शेअर केली आहे. पण हो ज्यावेळी मी पहिल्यांदा त्याच्यासोबत क्रिन शेअर केली तेव्हा तो कसा माझ्यासोबत मॅच होईल, कशी आमची केमिस्ट्री दिसेल हे प्रश्न माझ्या मनात होते. पण जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली तर आमचं बॉण्डिंग जमलं. तानाजी सोबत काम करतानाचा खूप छान अनुभव होता. झाला बोभाटा मधील माझं पैंजण हे गाणं मी खुपदा पाहिलं आहे असं तानाजीने मला सांगितलं. प्रत्यक्षात जेव्हा आमची भेट झाली तेव्हा आमचं खूप चांगल बॉण्डिंग झालं. आता आम्ही खूप चांगले मित्र आहोत. 

चित्रपटाची निवड कशी केली आणि यातील भूमिकेसाठी काही खास तयारी केली का याबद्दल तिने सांगितले की, या चित्रपटाची पूर्ण कथा मला वन लाईनमध्ये माहित होती. खरं सांगायचं झालं तर चित्रपटाची कथा मी आधी पूर्ण वाचली नव्हती. या चित्रपटाच्या टीमकडून मला कॉल आला. मी त्यावेळी नरेशन ऐकलं. माझी चित्रपटामधील भूमिका मी समजून घेतली आणि होकार कळवला. त्यावेळी लॉकडाऊन नुकतच संपल होतं आणि माझ्याकडे या चित्रपटाची संधी चालून आली.

Related Stories

‘मिस्टर इंडिया’च्या रिमेकवरुन भडकली सोनम कपूर

tarunbharat

प्लॅनेट टॅलेंटच्या यादीत गायत्री दातार

Patil_p

होम मिनिस्टरमध्ये सन्मान माहेरवाशिणींचा

Patil_p

दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा : अमिता कुलकर्णी

datta jadhav

आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार राधिका आपटे

Patil_p

क्रांतिवीर राजगुरूंचे आयुष्य वेबसिरीजमध्ये

Patil_p
error: Content is protected !!