तरुण भारत

गडमुडशिंगी येथील घरफोडी उघडकीस, पाच जणांना केली अटक

उचगाव / वार्ताहर

गडमुडशिंगी (ता. करवीर ) येथील घरफोडी उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश आले असुन पाच आरोपींना अटक करण्यातआली.

गडमुडशिंगी (ता. करवीर ) येथील जमाल आलमसाब मुल्ला (वय ४२ राहणार खत कारखाना जवळ गडमुडशिंगी) यांचे घरी दिनांक 6/9 /2020 रोजी सकाळी पावणे सहा ते पावणे आठ यादरम्यान घरी कोणीही नसताना घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या घराच्या बेडरूम व तिजोरीच्या चाव्यांचा वापर करून आतील रोख आठ लाख वीस हजार रुपये व एक डीव्हीआर पाच हजार रुपये किंमतीचा असा ८ लाख २५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाच जणांना अटक केली आहे. रवी राजाराम पोवार वय 32 रा. एस पी स्पोर्टस् शिरगावे गल्ली गडमुडशिंगी, तोफिक बाबासो मुल्ला वय 28 राहणार मदिना कॉलनी विक्रमनगर कोल्हापूर, अझरुद्दीन सलीम सय्यद वय 32 राहणार अष्टविनायक कॉलनी विक्रम नगर कोल्हापूर ,ऋतुराज सुनील शिंदे वय 26 राहणार माळवाडी गडमुडशिंगी आणि महेश बालाजी डोंगळे वय 25 राहणार छत्रपती कॉलनी गडमुडशिंगी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शनिवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत मोहिते यांना संशयित आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे श्रीकांत मोहिते विजय कारंडे किरण गावडे वैभव पाटील कुमार पोद्दार उत्तम सडोलीकर प्रदीप पवार अमर वासुदेव रणजित कांबळे किरण भोगण यांच्या पथकाने टेंबलाई मंदिर जवळ कारवाई करीत महेश डोंगरे व ऋतुराज शिंदे याला ताब्यात घेतले, त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आणखीन तीन जणांना ताब्यात घेतले.

या पाच जणांना गांधीनगर पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता दि.२५ पर्यंत पोलिस कोठडी दिली. या बाबत अधिक तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली

Related Stories

‘सीपीआर’मध्ये कोव्हॅक्सिन दाखल, कोणत्याही क्षणी ‘डोस’

triratna

कोल्हापूर : लवकरच चाखायला मिळणार ‘बीटी’ वांग्याची चव

triratna

करवीर तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर; तरूण भारतच्या लव्हटेंना करवीर भूषण पुरस्कार

triratna

भाजपसोबत जाण्यासाठी रश्मी शुक्लांचा फोन आला; यड्रावकरांचा खुलासा

Shankar_P

स्त्रियांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी

Patil_p

पाटगाव परिसरात विक्रमी पावसाची नोंद

Shankar_P
error: Content is protected !!