तरुण भारत

भातगावात वाळूचा संक्शन पंपाव्दारे उपसा

वार्ताहर/ संगमेश्वर

तालुक्यातील भातगाव पुलाजवळ संक्शन पंपाव्दारे दिवस-रात्र वाळू उपसा केला जात असल्याने मासेमाऱयांवर उपासमारीची वेळ आली आहे. वाळू उपसा दिवस-रात्र होत असतानाही महसूल विभाग कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Advertisements

संगमेश्वर तालुक्यातील खाडीभाग हा शांत मानला जातो. मात्र बेकायदा वाळू उपसामुळे व वादावादीमुळे खाडीभाग अशांत होत चालला आहे. भातगाव पुलाजवळच मोठय़ा प्रमाणात संक्शन पंपाव्दारे वाळू उपसा केला जात आहे. जयगड खाडीच्या मुखाशी आणि संगमेश्वर तालुक्याशी जोडल्या गेलेल्या खाडीभागाच्या मुखाजवळच मोठय़ा प्रमाणात दिवस-रात्र वाळू उपसा केला जात असल्याने मासेमारीवर विपरित परिणाम झालेला दिसत आहे. त्यामुळे मासेमारीवर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुलाच्या बाजूलाच मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा केला जात असल्याने पुलालाशी धोका पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संक्शन पंपाव्दारे दिवस-रात्र वाळू उपसा होत असताना महसूल विभाग कोणतीच कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मेढे येथील मोठय़ा प्रमाणात वाळूचे ढिग

भातगाव पुलाजवळ वाळू उपसा करुन मोठय़ा प्रमाणात ढिग मेढे येथे शेतात आणले जात आहे. हजारो ब्रास साठवून ठेवली गेली असून या वाळूला सोन्याचा भाव मिळत असल्याचे बोलले जात आहे. या वाळूमध्ये वरिष्ठही गुंतल्याचे बोलले जात आहे.

भातगाव येथील वाळू उपसाबाबत तलाठय़ांना संपर्क केला असता त्यांनी वाळू उपसा अधिकृत असल्याचे सांगितले, मात्र रात्री उपसा सुरु असल्याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.

Related Stories

रत्नागिरी : दापोलीत बुधवारी पावसाचा जोर कायम

Abhijeet Shinde

विद्युतीकरणानंतर कोकण रेल्वेचे कोटय़वधी रुपये वाचणार

NIKHIL_N

बेस्टच्या मदतीसाठी सिंधुदुर्गातून ‘एसटी’

NIKHIL_N

महावितरणच्या कर्मचाऱयाला मारहाण, संशयितांना अटक

Patil_p

खेडमध्ये परिचारिकेसह ६ जणांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

राणे यांच्या अटकेचा भाजपकडून भावनिक बाजार डॉ. परुळेकर यांची टीका

NIKHIL_N
error: Content is protected !!