तरुण भारत

गृहनिर्माण मंडळाच्या निवासी गाळेधारकांना कायदेशीर हक्क मिळणार- मंत्री माविन गुदिन्हो

प्रतिनिधी / वास्को

गोवा गृहनिर्माण मंडळाच्या जवळपास साडे पाचशे निवासी गाळेधारकाना घरांचे हक्क बहाल करण्यात येणार आहेत. आतापर्यंत या मालकांना घरांचे कायदेशीर हक्क बहाल करण्यात आले नव्हते. मागच्या जवळपास चाळीस वर्षांपासून ही कुटुंबे कायदेशीर मालकीच्या प्रतिक्षेत राहिलेली असून त्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी म्हटले आहे.

Advertisements

मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते नवेवाडे वास्को येथे रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री गुदिन्हो म्हणाले की, गोवा गृहनिर्माण मंडळाला पूर्ण शुल्क भरलेले जवळ साडेपाचशे निवासी गाळेधारक असून मंडळाची ही घरे मागणी असूनही कायदेशीररीत्या त्यांची झालेली नाहीत. त्यांना कायदेशीर हक्क बहाल केले जाणार आहेत. या प्रक्रियेसोबतच अनेक बेकायदा घरेही महसुल खात्याच्या माध्यमातून नियमीत केली जाणार आहेत असे मंत्री गुदिन्हो यावेळी म्हणाले.

नवेवाडे व शांतीनगर भागाला जोडणारा आणखी एक रेल्वे उड्डाण पुल उभारला जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. हल्लीच केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या उड्डाण पुलाच्या जागेची पाहणी केलेली असून नवीन पुल उभारण्याचे त्यांनी आश्वासन दिल्याचे ते म्हणाले. आपल्या दाबोळी मतदारसंघात रेल्वे दुपदरीकरणाला कुणाचाही विरोध नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी समाधान व्यक्त केले. रेल्वेचे अधिकारी आणि आपण जेव्हा दुपदरीकरण मार्गाचे सर्वेक्षण केले तेव्हा आपल्या विरोध दिसून आला नाही असे ते म्हणाले. या भागात रेल्वेसाठी कुणाचेही घर जाणार नाही. रेल्वेने लोकांसाठी अतिरीक्त उड्डाण पुल तसेच नवीन रस्त्याही तयार करण्याचे नियोजन केलेले असल्याची माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

Related Stories

विकासाच्या प्रकल्पांपेक्षा आरोग्य सुविधांवर जादा खर्च करा

Omkar B

दिल्ली बैठकीत खाणींवर तोडगा नाही

Patil_p

राज्यात दीपोत्सवाला उत्साहात प्रारंभ

Patil_p

मार्केट संकुलातील व्यापाऱयांवर नुकसानीचे सावट

Patil_p

कालेतील ट्रकांना तळे खाणीवर माल भरण्यास मज्जाव

Amit Kulkarni

टुगेदर फॉर डिचोलीचा 25 सूत्री जाहिरनामा प्रकाशित

Amit Kulkarni
error: Content is protected !!