22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / नाशिक : 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असतानाच महाराष्ट्रात मात्र, पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.  


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहनही भुजबळ यांनी यावेळी केले आहे. तसेच माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले आहेत.


दरम्यान, राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती. लग्न सोहळा पार पडून आणखी 24 तासही उलटत नाही आहेत, तोपर्यंतच भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.


आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नात विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. भुजबळांबरोबर शरद पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार दिलीप बनकर तसेच राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी लग्नसोहळ्याला उपस्थित होते. 


यासोबतच भुजबळ यांनी नाशिकमध्ये येत्या 26 ते 28 दरम्यान होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा देखील घेतला होता. तसेच त्याची माहिती माध्यमांनाही दिली होती. आता छगन भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सगळ्यांचीच धाकधुक वाढली आहे.

Related Stories

तलवारीने केक कापून वाढदिवस, ६ जणांवर गुन्हा

triratna

सांगली जिल्ह्यात आणखी आठ जण कोरोनाबाधित

triratna

गाझियाबाद जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर

datta jadhav

महाबळेश्वरमध्ये केशर लागवडीचा प्रयोग यशस्वी

triratna

एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता जाहीर

prashant_c

महाराष्ट्र : कोरोनाबाधितांची संख्या 16 लाख पार

pradnya p
error: Content is protected !!