तरुण भारत

स्मार्टफोन कंपनी शाओमी कार निर्मितीत उतरणार

चीनमधील स्मार्टफोन निर्माती कंपनी – इलेक्ट्रिक कार्स बनवणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्मार्टफोन क्षेत्रात कार्यरत असणारी चिनी कंपनी शाओमी आता नव्या व्यवसायाचा शुभारंभ करणार असल्याचे सांगण्यात येते. कंपनी भविष्यात इलेक्ट्रिक कार निर्मिती करणार आहे. पेंगन्यूजच्या सूत्रांकडून याबाबतची माहिती मिळाली आहे.

2019 मध्ये चिनी इलेक्ट्रिक कार स्टार्टअप झेपेंगमध्ये शाओमीने गुंतवणूक केली होती. सदरच्या नियोजीत प्रकल्पासाठी कंपनीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरची संघ सदस्यांची टीमही कार्यरत असल्याचे समजते.

सीईओ घेतील जबाबदारी

इलेक्ट्रिक कार निर्मितीचे स्वप्न शाओमीला साकारायचे असून यासाठी सध्याचे शाओमीचे सीईओ ली जून हे जबाबदारी घेऊ शकतात, असे सांगितले जात आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक कार निर्मितीचे नेतृत्त्व सीईओ आपल्या खांद्यावर घेतील, हे जवळपास नक्की झालेलं आहे. कार निर्मितीत प्रवेश केल्यावर हुवावे या कंपनीच्या अडचणी मात्र वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

एलॉन मस्कबरोबर बैठक

मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या घडीला स्मार्टफोनच्या व्यवसायात एक प्रकारची मंदी असल्याचा अंदाज कंपनीने बांधला आहे. या अनुषंगाने भविष्याचा वेध घेऊन स्मार्ट कार निर्मितीवर भर देण्याचा विचार शाओमीने पक्का केला आहे. सध्या जगभरात इलेक्ट्रिक कार्सला पसंती वाढत असून या क्षेत्रातील मागणीचा विचार करूनच कंपनी या क्षेत्रात उतरत असल्याचे सांगण्यात येत आहे. शाओमीचे सीईओ जून यांनी 2013 मध्ये अमेरिकेची दोनदा वारी केली होती. त्यावेळी टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांची भेट घेतली होती. कदाचित या भेटीत भविष्यातील कारसंबंधीच बोलणी झाली असावी.

भारतात कार्सना वाढती मागणी

जगभरातच आता भारताचा डंका वाजू लागला आहे. उत्पादन प्रक्रियेला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अनेक कंपन्या भारतात निर्मिती प्रकल्प सुरू करण्याच्या विचारात आहेत. या प्रक्रियेला खरे तर सुरुवातही झाली आहे.  आत्मनिर्भर भारतनंतर अनेक विदेशी कंपन्यांचा कल भारतात येण्याकडे दिसतोय. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढलेली असून टाटा आणि महिंद्रा यांनी यात अधिक रस घेतला आहे. हे पाहूनच शाओमीनेही या संधीचा फायदा उठवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

सोनालिकाचा इलेक्ट्रीक ट्रक्टर बाजारात

Omkar B

सणासुदीत प्रवासी वाहन विक्री तेजीत

Patil_p

3-रो एमजी हेक्टर प्लस भारतीय बाजारात

Patil_p

‘आल्टो’ येतेय लवकरच नव्या रूपात

Patil_p

हय़ुंडाई क्रेटाची निर्यात 2 लाखाच्या घरात

Patil_p

टीव्हीएस अपाची आरटीआर 200 दाखल

Patil_p
error: Content is protected !!