तरुण भारत

शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 50 हजाराखाली

कोरोना रुग्ण वाढीचे सावटः सेन्सेक्समध्ये हजार अंकांची घसरण

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येने गुंतवणूकदारांना बुचकळ्यात टाकले आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर सोमवारी दिसला. आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात सेन्सेक्स 1 हजार अंकांनी जबर घसरला तर निफ्टीही 300 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. गुंतवणूकदारांचे 3.8 लाख कोटी रुपये बुडाल्याचे सांगितले जात आहे.

बाजारात सोमवारी चौफेर विक्रीचा माहोल होता. मागच्या मंगळवारपासून सलग 4 दिवस बाजार घसरणीत होता. सोमवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 1 हजार 145.44 अंकांच्या घसरणीसह 49,744.32 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 306.05 अंकांच्या घसरणीसह 14,675.70 अंकांवर बंद झाला. चौफेर घसरणीमुळे लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 3.62 लाख कोटींनी घटले आहे. देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने गुंतवणूकदार निराश झाले आहेत. महाराष्ट्र, केरळ व देशातील इतर 16 राज्यात रुग्ण वाढले आहेत. युरोपच्या बाजारातही मोठी घसरण अनुभवायला मिळाली. स्थानिक बाजारात प्रमुख कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण दिसली. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक व एसबीआय या कंपन्यांचे समभाग घसरणीत दिसले.

सेन्सेक्समध्ये डॉ. रेड्डीज आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे समभाग सर्वाधिक प्रभावीत झालेले पहायला मिळाले. या समभागांचा भाव 4 टक्के खाली आला होता. रिलायन्स, टीसीएस व एसबीआयचे समभाग 3 टक्क्यांनी घसरले होते. बँकिंग, ऑटो आणि आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये विक्री दिसून आली. एकावेळी निफ्टी निर्देशांक 312 अंकाच्या घसरणीसह प्रवास करत होता. धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी खरेदी दिसली. धातू निर्देशांक 1 टक्के वाढीसह व्यवहार करत होता. हिंदुस्थान कॉपरचे समभाग 13 टक्के इतके वाढले होते.

विदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम

देशात आर्थिक सुधारणांना गती दिसत असल्याने गुंतवणुकदारांनी गुंतवणूक कायम ठेवली. 1 ते 19 फेब्रुवारीच्या कालावधीत विदेशी गुंतवणूकदारांनी 24965 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे दिसून आले. इक्वीटी मार्केटमध्ये 24204 कोटी रुपये व डेट मार्केटमध्ये 761 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

जागतिक बाजारातील स्थिती

जागतिक बाजारात हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 419 अंक, चीनचा शांघाई कम्पोझीट निर्देशांक 53 अंक आणि कोरीयाचा कोस्पी निर्देशांक 27 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. जपानचा निक्की 153 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता.

शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता. सेन्सेक्स 434 अंकांच्या घसरणीसह 50,889 व निफ्टी 137 अंकांच्या घसरणीनंतर 14981.75 वर बंद झाला होता.

Related Stories

क्रेडिट कार्डद्वारे खर्चाच्या प्रमाणात वाढ

Patil_p

देशांतर्गत प्रवासी वाहतूक वाढणार

Patil_p

आगामी काळात जगातील सर्वात मोठी कामगारांची फळी भारतात?

Omkar B

बँकांमधील घोटाळय़ात दुप्पटीने वाढ

Patil_p

टेस्लाकडून भारतात भरतीचे नियोजन

Patil_p

आर्थिक वृद्धीदर 12.8 टक्क्यावर राहण्याचे संकेत

Amit Kulkarni
error: Content is protected !!