तरुण भारत

मेट्रोमॅननंतर भारताची धावराणी पी.टी.उषा भाजपच्या वाटेवर

केरळमध्ये पक्षाला लाभ होण्याची शक्यता

तिरुअनंतपुरम

केरळमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजप देवांची भूमी असलेल्या केरळमध्ये स्वतःचा प्रभाव वाढविण्यासाठी जोरदार पावले उचलत आहे. काही दिवसांपूर्वीच केरळशी संबंधित आणि मेट्रोमॅन या नावाने प्रसिद्ध ई. श्रीधरन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप आता धावराणी नावाने प्रसिद्ध माजी ऑलिम्पिकपटू पी.टी. उषा यांच्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. धावराणी पी.टी. उषा यांना पक्षात सामील करण्यासाठी भाजपने आक्रमक टाकली आहेत. उषा यांनी कृषी कायद्यांप्रकरणी भाजप तसेच केंद्र सरकारला पाठिंबा दर्शविला होता. उषा यांच्या ट्विटमध्ये भाजपच्या दिशेने असलेला ओढा आणि समर्थनही दिसून आले होते. सामाजिक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि गायिका रिहाना यांच्या टिप्पणीची निंदा करणाऱया महनीयांमध्ये पी.टी. उषा यांचाही समावेश होता. आम्ही आमच्या संस्कृती आणि वारशावर गर्व करते. आमच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करू नका. स्वतःचे मुद्दे कशाप्रकारे सोडवावेत, हे आम्ही जाणतो. कारण आम्ही एक आणि एकच राष्ट्र आहोत, असे उषा यांनी म्हटले हेते. भाजप चित्रपटसृष्टीतील काही लोकप्रिय कलाकार, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांनाही पक्षात सामील करू पाहत आहे. ‘मिशन दक्षिण’सह भाजप काँग्रेसच्या मतपेढीला भगदाड पाडू इच्छित आहे.

Related Stories

‘सीएए’ला तत्काळ स्थगिती नाही

Patil_p

कोरोना : आता संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन : नरेंद्र मोदी

tarunbharat

ममतांच्या कुटुंबीयांवर घोटाळय़ाचे शिंतोडे

Patil_p

उत्तराखंडात 49 नवे रुग्ण; ॲक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण 4 टक्क्यांनी कमी

pradnya p

जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 454 नवे कोरोना रुग्ण; 8 मृत्यू

pradnya p

शेतकरी संघटनांनी केले मोदींच्या भूमिकेचे स्वागत

Patil_p
error: Content is protected !!