तरुण भारत

वायनाडमध्ये राहुल गांधी यांनी चालविला ट्रक्टर

वृत्तसंस्था/  वायनाड

केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी राज्याच्या दौऱयावर आहेत. राहुल गांधी यांनी सोमवारी स्वतःचा मतदारसंघ वायनाडमध्ये सर्वसामान्यांच्या गाठीभेटी घेतल्या तसेच मोर्चात सहभागी होत ट्रक्टर चालविला आहे. या मोर्चादरम्यान राहुल यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकावर टीकेची झोड उठविली आहे.

एका वृद्ध महिलेच्या भेटीदरम्यान राहुल यांनी तिला एक मास्क दिला आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात राहुल गांधी यांची आक्रमक भूमिका वायनाडमध्येही दिसून आली. भारतीय शेतकऱयांना कशाप्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते, हे जग पाहत आहे, पण दिल्लीतील केंद्र सरकारला शेतकऱयांच्या दुःखाची जाणीव नाही. जगातील एका प्रसिद्ध पॉपस्टारने याप्रकरणी टिप्पणी केली, पण सरकारनेही काहीच केले नाही. नव्या कायद्यांमुळे केवळ मोदींच्या काही मित्रांना लाभ होणार नाही. सरकारवर जोवर दबाव येत नाही, तोवर ते कायदे मागे घेणार नसल्याचे विधान राहुल यांनी केले आहे.

Related Stories

कोरोनाची धास्ती : पंजाबमध्ये 31 मार्चपर्यंत शाळा बंद

pradnya p

बीआरओने रचला इतिहास

Patil_p

1 जूनपासून नॉन एसी रेल्वे धावणार

Patil_p

छेडछाडीच्या आरोपीकडून मुलीच्या पित्याची हत्या

Patil_p

पंजाबमध्ये मागील 24 तासात 582 नवे कोरोनाबाधित

pradnya p

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार फेस्टिव्हल ॲडव्हान्स अन् प्रवास रजा भत्ता

datta jadhav
error: Content is protected !!