तरुण भारत

‘पवित्र पेटी’पायी 800 भाविकांचा मृत्यू

वृत्तसंस्था/ अदिस अबाबा

इथियोपियामध्ये एका अत्यंत पवित्र आर्क ऑफ कॉवेनंटला वाचविण्यासाठी शेकडो लोकांनी बलिदान केले आहे. हे आर्क इथियोपियाच्या तिगरे क्षेत्रात सेंट मेरी चर्चमध्ये सुरक्षा कर्मचाऱयांच्या उपस्थितीत सुरक्षित असते आणि ख्रिश्चन धर्मात याला अत्यंत पवित्र मानण्यात येते. सुमारे 800 जणांना सेंट मेरी चर्चच्या परिसरात मारण्यात आले असून अनेक दिवसांपर्यंत त्यांचे मृतदेह रस्त्यांवर पडून होते.

गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर लोकांनी चर्चच्या दिशेने धाव घेतली होती, चर्चमधील पाद्रय़ांच्या मदतीसाठी गेलेल्या या लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. ही घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती, पण त्यावेळी इथियोपियाचे पंतप्रधान एबे अहमद यांनी इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद केली होती. यामुळे जगाशी असलेला इथियोपियाचा संपर्क तुटला होता. पण आता इंटरनेट पुन्हा मर्यादित स्वरुपात सुरू करण्यात आले आहे.

नोव्हेंबरमध्ये या क्षेत्रात तणाव वाढल्याने ही पवित्र पेटी अन्य शहरात नेण्यात येईल किंवा ती नष्ट करण्यात येईल, अशी भीती लोकांना वाटू लागली होती. तर लुटारूंनी कुणावरच दयामाया न दाखवत अंदाधुंद गोळीबार करत शेकडो जणांचा जीव घेतला आहे.

अहमद सत्तेवर येण्यापूर्वी इथियोपियावर 27 वर्षांपर्यंत तिगरे पीपल्स लिबरेशन आर्मीची राजवट होती. पण तिगरे क्षेत्राची लोकसंख्या पूर्ण देशाच्या तुलनेत केवळ 6 टक्के आहे. पण या भागातील शक्तींचे राष्ट्रीय राजकारणावर दीर्घकाळापर्यंत वर्चस्व राहिले आहे. पण त्यांच्या शासनकाळात मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार तसेच मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना घडल्या होत्या. याचमुळे तिगरे पीपल्स लिबरेशन प्रंटचे सरकार बदनाम झाले होते.

तिगरे क्षेत्रात सैन्याच्या एका शिबिरावर हल्ला झाल्यावर पंतप्रधान अहमद यांनी कारवाईचा आदेश दिला होता. पंतप्रधानांच्या आदेशाला प्रत्युत्तर म्हणून तिगरे क्षेत्रातील मुख्य राजकीय पक्षाने सैन्याच्या उत्तर कमांड तळावर कब्जा करण्याचा आदेश स्वतःच्या सदस्यांना दिला होता. तेव्हापासून या क्षेत्रात गृहयुद्धासारखी स्थिती असून कोरोनामुळे ही अधिकच बिकट होत गेली आहे.

Related Stories

चीन, चिनी कम्युनिस्ट पार्टी हा आशियाला धोका

Patil_p

एक्स-रेद्वारेही समजू शकतो कोरोना संसर्ग

Patil_p

उइगूर मुस्लिमांना झिडकारणार तुर्कस्तान

Patil_p

‘पुलवामा’ प्रकरणी भाजप-काँगेस शब्दयुद्ध

Patil_p

आगामी काळ खडतर : बायडेन

Omkar B

ब्रिटिश प्रवाशांवर बंधने

Patil_p
error: Content is protected !!