तरुण भारत

20 लाख रोजगार निर्मितीचे नितीश सरकारचे आश्वासन

वृत्तसंस्था/ पाटणा

नितीश कुमार सरकारकडून सोमवारी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी बिहारचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पाद्वारे राज्यात 20 लाख रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन नितीश सरकारने दिले आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांच्या 10 लाख रोजगाराच्या आश्वासनाला नितीश यांचे हे प्रत्युत्तर असल्याचे मानले जात आहे.

बिहारच्या विकासासाठी 2015 मध्ये 7 निश्चय योजना सुरू करण्यात आली, यांतर्गत सातत्याने कामे केली जात आहे. 4671 कोटी रुपयांचा निधी आता 7 निश्चय भाग-2 साठी उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रत्येक घराला वीजजोडणी तसेच नळजोडणी देण्यात येत आहे. टाळेबंदीमुळे आर्थिक हालचाली थंडावल्या असल्या तरीही अडचणी-आपत्तींना आम्ही घाबरत नाही. कोरोना संकट अद्याप टळलेले नसले तरीही लसीकरणाचे काम वेगाने सुरू असल्याचे तारकिशोर म्हणाले.

Related Stories

बँक खासगीकरणावर सरकारशी चर्चा सुरू

Amit Kulkarni

चर्चा पुन्हा अनिर्णित

Patil_p

नरेंद्र मोदी-नितीशकुमारांनी विरोधकांना फटकारले

Omkar B

काश्मीरमध्ये चकमकीत चार जवानांना हौतात्म्य

Patil_p

खासदार रवी किशन यांच्या पीए ला कोरोनाची बाधा

pradnya p

मनी लॉन्ड्रिंगच्या चिनी रॅकेटचा खुलासा

Patil_p
error: Content is protected !!