तरुण भारत

10 फूट लांब मगरीने गिळला बूट

2 महिन्यांनी शस्त्रक्रियेद्वारे काढला बाहेर

10 फूट लांब आणि 158 किलो वजनाच्या मगरीने मानवी बूटच गिळला. हा बूट तिच्या पोटात सुमारे 2 महिन्यांपर्यंत राहिला. या मगरीचे नाव आहे ऍन्युकेट. ही अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये सेंट ऑगस्टीन ऍलिगेटर झुओलॉजिकल पार्कमध्ये राहते. डिसेंबर 2020 मध्ये या मगरीने एका पर्यटकाचा बुटच गिळला होता.

Advertisements

मोठी तपासणी

मगरीशी संबंधित तज्ञांनी पचत नसलेले काही तिने खाल्ले आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिची तपासणी करण्यात आली आहे. प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनानुसार मगरी इकडे तिकडे पाहत असतात, खाण्यासारखी एखादी वस्तू वाटल्यास मगरी त्या खाऊन टाकतात. या मगरीसोबतही असाच प्रकार घडला आहे.

मगर ही वस्तू पचवू शकत नसल्याचे वाटल्यावर तपासकर्त्यांनी वैज्ञानिक पद्धत अवलंबिली. युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा कॉलेज ऑफ व्हेटर्नरी मेडिसीनचे तज्ञ यावर काम करत होते. त्यानंतर गॅस्ट्रॉनॉमी करण्यात आली, हे एकप्रकारे कृत्रिम एक्सटर्नल ओपनिंग असते. यातून पोटातील पचू न शकलेल्या गोष्टी बाहेर काढण्यात आल्या. यात हा बूटही सामील होता. रात्रभर रुग्णालयात ठेवल्यावर दुसऱया दिवशी मगरीला उद्यानात आणले गेले असून तेथे तिची प्रकृती पूर्वपदावर येत आहे.

Related Stories

राष्ट्रपती रामनाथ कोविंद बांगलादेश दौऱयावर

Amit Kulkarni

अमेरिकेत कोरोना लसीकरणास प्रारंभ

Patil_p

सिंगापूरमध्ये रूग्णांमध्ये वाढ

Patil_p

100 वर्षांची पॉवरलिफ्टर

Patil_p

बांगलादेशात 1 जुलैपासून कठोर लॉकडाउन

Patil_p

मॉडर्ना लसीला मंजुरीची ट्रम्प यांची घोषणा

Patil_p
error: Content is protected !!