तरुण भारत

गृहयुद्धाच्या जखमा विसरतोय सीरिया

इमारतींची चाळण पण निर्धाराच्या पोलादाद्वारे अपेक्षांचा ‘पंच’

सीरियाच्या अतारिब येथील छायाचित्र मानवी निर्धाराची किमया दर्शविते. तेथील मुले आणि तरुण स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमध्ये अपेक्षांचे ‘पंच’ लावत असून जेणेकरून स्वतःच्या डोकं अन् मनातून गृहयुद्धाच्या वाईट आठवणी विसरता येईल. अतारिबमध्ये राहणारे 31 वर्षीय शिक्षक अहमद द्वार यांनी क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात नुकसानग्रस्त झालेल्या इमारतींना बॉक्सिंग रिंगचे स्वरुप दिले आहे. तेथे दिवसभरात 100 हून अधिक मुले बॉक्सिंग शिकण्यास येत आहेत.

Advertisements

सीरिया कधीकाळी समृद्ध देश होता, पण गृहयुद्धाने येथील रयाच घालविली आहे. देश आर्थिक संकटाला तोंड देत असून शाळा-महाविद्यालये बंद झाली आहेत, देशातील निम्मी लोकसंख्या बेघर झाली आहे. सीरियाची बिघडती स्थिती मुलांच्या मनामध्ये घर करून बसू नये म्हणून त्यांना बॉक्सिंग शिकविण्यास सुरुवात केल्याचे अहमद सांगतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार गृहयुद्धामुळे सीरियात मागील 10 वर्षांमध्ये 3.80 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यात 22 हजार मुले आणि 13612 महिलांचाही समावेश आहे.

Related Stories

टांझानिया झाला कोरोनामुक्त

datta jadhav

अमेरिकेत बाधितांची संख्या 1.25 कोटींवर

datta jadhav

जपानमध्ये 7 दिवसांमध्ये दुसरी मोठे चक्रीवादळ

Patil_p

जगभरात 51.94 लाख कोरोनाबाधित

datta jadhav

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 88 हजारांवर

datta jadhav

बर्लिनसाठी अवघड काळ

Patil_p
error: Content is protected !!