तरुण भारत

आता कधीच थांबणार नाही हृदयाची धडधड

मृतांच्या हृदयाला यंत्रांद्वारे जिवंत करून 6 मुलांमध्ये प्रत्यारोपित,  नवे तंत्रज्ञान मैलाचा दगड असल्याचे डॉक्टरांचे उद्गार

ब्रिटनमध्ये डॉक्टरांनी पहिल्यांदाच एका विशेष प्रकारच्या यंत्राचा वापर करत अशा हृदयाचे यशस्वीपणे प्रत्यारोपण केले आहे, ज्याची धडधडच बंद झाली होती. म्हणजेच मृत घोषित करण्यात आलेल्या व्यक्तींचे हे हृदय होते. आतापर्यंत 6 मुलांमध्ये अशा हृदयांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. ही सर्व मुले आता पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. यापूर्वी केवळ बेन डेड घोषित झालेल्या व्यक्तींच्या हृदयाचेच प्रत्यारोपण व्हायचे.

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. केम्ब्रिजशायरच्या रॉयल पेपवर्थ रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ऑर्गन केयर यंत्राद्वारे मृत व्यक्तींच्या हृदयाला जिवंत करून 6 मुलांच्या शरीरात धडधड निर्माण केली आहे.

अशी कामगिरी करणारे हे जगातील पहिले वैद्यकीय पथक ठरले आहे. आमचे हे तंत्रज्ञान केवळ ब्रिटन नव्हे तर जगासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे उद्गार एनएचएसच्या ऑर्गन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन विभागाचे संचालक डॉ. जॉन फोर्सिथ यांनी काढले आहेत.

मागील 2-3 वर्षांपासून अवयवदानाच्या स्वरुपात हृदय मिळण्याची प्रतीक्षा करत असलेल्या 12 ते 16 वयोगटातील 6 मुलांना या तंत्रज्ञानामुळे नवे जीवन मिळाले आहे. म्हणजेच लोक आता मरणोत्तर हृदयही दान करू शकतील. लोकांना प्रत्यारोपणासाठी दीर्घकाळ प्रतीक्षाही करावी लागणार नाही.

ऑर्गन केयर सिस्टीम

एनएचएसच्या डॉक्टरांनी ‘ऑर्गन केयर सिस्टीम’ यंत्र निर्माण केले आहे. मृत्यूची पुष्टी होताच दात्याचे हृदय त्वरित काढून या यंत्रात 12 तासांपर्यंत तपासले जाते आणि त्यानंतरच प्रत्यारोपण केले जाते. दात्याकडून मिळालेल्या हृदयाला प्राप्तकर्त्याच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार प्राणवायू, पोषक घटक आणि त्याचा रक्तगट या यंत्रात ठेवलेल्या हृदयात 24 तासांपर्यंत प्रवाहित केले जाते.

Related Stories

204 देशांमध्ये संसर्ग 54199बळी

Patil_p

पाकिस्तानवर उलटला डाव

Patil_p

चीनपाठोपाठ आता नेपाळचा नकाशात खोडसाळपणा

Patil_p

मेक्सिको : 20, 548 नवे कोरोना रुग्ण; 1,539 मृत्यू

pradnya p

मेक्सिकोत कोरोनाबळींच्या संख्येने गाठला 1.10 लाखांचा टप्पा

datta jadhav

इस्रायल : निदर्शने सुरूच

Omkar B
error: Content is protected !!