तरुण भारत

‘जगमे थंधीरम’चा टीझर प्रदर्शित

मिशांमधील धनुषचा लुक आकर्षक

दक्षिणेतील दिग्गज अभिनेता आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई धनुष याचा नवा चित्रपट ‘जगमे थंधीरम’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. धनुषच्या या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

एका मिनिटाच्या टीझरमध्ये धनुषच्या व्यक्तिरेखेविषयी कल्पना देण्यात आली आहे. यातील धनुषचा लुक पाहता तो एका गँगस्टरची व्यक्तिरेखा साकारत असल्याचे जाणवते. मदुराई येथे राहणारा व्यक्ती पण लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांमध्ये अडकलेल्या व्यक्तीचे पात्र धनुषने साकारले आहे.

टीझर प्रसारित करण्यासह निर्मात्यांनी चित्रपट थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. तर धनुष या निर्णयावर नाराज असल्याचे समजते. धनुषच्या या चित्रपटात ऐश्वर्या लक्ष्मी, जेम्स कॉस्मो यासारखे अनेक कलाकार दिसून येणार आहेत.

Related Stories

करण जोहरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र; बॉलीवूडबाबत म्हणाला…

pradnya p

पहिला लष्करी ऍक्शन मराठी चित्रपट लवकरच भेटीला

Patil_p

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मेरे देश की धरती सज्ज

Patil_p

कंगना रानौतच्या सुरक्षेबाबत हिमाचल प्रदेश सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

pradnya p

महात्मा जोतिराव आणि सावित्रीबाई फुलेंवर येणार मराठी चित्रपट

Patil_p

देशात पहिल्यांदाच खेळण्यांचा मेळा

Amit Kulkarni
error: Content is protected !!