तरुण भारत

सुशांत सिंग राजपूतला सन्मान देणार केंद्र सरकार

राष्ट्रीय पुरस्काराला अभिनेत्याचे नाव देण्याचा विचार

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला सुमारे 9 महिने उलटले असले तरीही त्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघण्याची शक्यता कमीच आहे. सुशांतसाठी आता कुणीच काही करू शकत नसले तरीही केंद्र सरकार त्याच्या नावावर एक पुरस्कार सुरू करण्याचा विचार करत आहे.

सुशांतचे नाव कायमस्वरुपी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये नोंद होणार असल्याची चर्चा आहे. सुशांत सिंग याच्या नावावर एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्याचा विचार सुरू आहे. प्रस्ताव पुढे पाठविण्यात आला असला तरीही नोकरशाही आणि राजकारणात काही वेळ लागतोच असे विधान भाजपशी संबंधित एका सूत्राने केले आहे.

सुशांतच्या जीवनावर आधारित एक चित्रपट येणार असून त्याला ‘न्याय ः द जस्टिस’ हे नाव देण्यात आले आहे. चित्रपटाची निर्मिती विकास प्रॉडक्शन्सच्या बॅनर अंतर्गत होणार आहे.

Related Stories

देशात 85,362 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

बाधितांच्या संख्येत किंचित घट

datta jadhav

जम्मू काश्मीर : कोरोना रुग्णांनी ओलांडला 1.27 लाखांचा टप्पा

pradnya p

कोरोना झाल्यास घाबरू नका

Patil_p

‘विधानसभां’चा बिगूल वाजला

Patil_p

सीबीएसई दहावी-बारावी परीक्षा 4 मे 2021 पासून

Patil_p
error: Content is protected !!