तरुण भारत

‘भेडिया’त दिसणार वरुण-कृतीची जोडी

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि कृती सेनॉन यांची जोडी आता दिनेश विजान यांचा भयपट ‘भेडिया’त दिसून येणार आहे. ‘स्त्राr’ आणि ‘रुही’नंतर ‘भेडिया’चे दिग्दर्शक दिनेश विजान यांच्या प्रॉडक्शन हाउसचा हा तिसरा भयपट असणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यासह याचा टीझरही ऑनलाईन प्रदर्शित करण्यात आला आहे.

घनदाट जंगलात एक माणूस अचानक भेडिया ‘हिंस्त्र प्राणी’ होत असल्याचे टीझरमध्ये दाखविण्यात आले आहे. या भेडियेच्या पात्रात वरुण धवन असतील असे मानले जात आहे. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. दिलवालेनंतर वरुण आणि कृती यांच्या जोडीचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. चित्रपटात या दोघांसह अभिषेक बॅनर्जी आणि दीपक डोबरियालही दिसून येतील.

Related Stories

ड्रग्स प्रकरणी निर्माता करण जोहरला समन्स

pradnya p

अभिनेता संदीप नाहरने केली आत्महत्या

pradnya p

अरबाज खान, सोहेल खान, निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल

pradnya p

प्रियदर्शन जाधवचे वेबदुनियेत पदार्पण

Patil_p

संत मारो… बंजारा भाषेतील चित्रपट

Omkar B

मराठी, हिंदी दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन

pradnya p
error: Content is protected !!