तरुण भारत

रस्त्यावरून चालत गेले 139 वर्षे जुने घर

सॅन फ्रान्सिस्को शहराच्या रस्त्यांवरून रविवारी एक 139 वर्षे जुने दोन मजली घर जाऊ लागल्याचे पाहून लोकांना या घटनेचे चित्रण करण्याचा मोह आवरला नाही. या व्हिक्टोरियन हाउसला हायड्रॉलिक आणि ट्रकच्या मदतीने नव्या जागी हलविण्यात येत होते. या 5170 चौरस फूटांच्या घराला त्याचा मूळ पत्ता 807 प्रँकलिन सेंट येथून 635 फुल्टन सेंट येथे स्थानांतरित करण्यात आले आहे.

घर हलविण्याचे हे काम आव्हानात्मक होते, जे अभियंत्यांनी अत्यंत कुशलपणे पूर्ण केले आहे. घर नव्या ठिकाणी हलविताना वाटेत झाडे, सिग्नल्स आणि पार्किंग मीटरच्या अडथळय़ांनाही सामोरे जावे लागले आहे.

शहराच्या रस्त्यांवरून ही ऐतिहासिक इमारत जात असल्याचे पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. हे दृश्य एखादे संचलन पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रेक्षक उभे असल्यासारखे जाणवत होते.

Related Stories

लहान मुलांच्या शिंकेतून कोरोनाचा प्रसार अधिक वेगात

datta jadhav

लसीचे 3 कोटी डोस रशिया तयार करणार

Patil_p

8 कोटी लोक उपासमारीच्या वाटेवर

Patil_p

अलास्कात त्सुनामीचा इशारा

datta jadhav

कोविड-19 वरील नव्या औषधाची तयारी

Patil_p

ऑस्ट्रेलियात वणवा, हजारोंचे स्थलांतर

Patil_p
error: Content is protected !!