तरुण भारत

भारताशी चर्चेकरिता अमेरिकेला विनवणी

पाकिस्तानकडून नवा सूर- एफएटीएफच्या बैठकीची पार्श्वभूमी 

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

Advertisements

अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत असद मजीद खान यांनी बायडेन प्रशासनाला महत्त्वाची विनंती केली आहे. भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करण्याची पाकिस्तानची इच्छा आहे, पण याकरिता अमेरिकेला मदत करावी लागणार असल्याचे मजीद यांनी म्हटले आहे. चर्चेसाठी शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी भारत सरकारची असल्याचे असद यांनी एका थिंकटँकच्या कार्यक्रमात बोलताना नमूद केले आहे.

अलीकडच्या दोन महिन्यांमध्ये पाकिस्तानकडून वारंवार भारतासोबत चर्चेची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान इम्रान खान आणि विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी दोनवेळा जाहीर स्वरुपात चर्चेचे आवाहन केले आहे. पण भारताने दहशतवाद रोखला जात नाही तोवर चर्चा करणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे.

बायडेन प्रशासनाला सल्ला

वॉशिंग्टनच्या स्टिमसन सेंटरमध्ये बोलताना मजीद यांनी अमेरिकेला सल्लाही दिला आहे. दोन्ही शेजारी देश म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. चर्चेसाठी योग्य वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी भारत सरकारची असल्याचे मजीद म्हणाले. अफगाणिस्तानात शांतता नांदावी याकरिता बायडेन प्रशासनाने तालिबानशीही चर्चा करावी, पाकिस्तान स्वतःच्या बाजूने शांततेसाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचा दावा मजीद यांनी केला आहे.

भारतावरच आरोप

फेब्रुवारी 2019 मध्ये भारतात पुलवामा येथे हल्ला झाला. भारताने याचे खापर पाकिस्तानवर फोडले. पाकिस्तानात 300 दहशतवादी प्रशिक्षण घेत असल्याचे भारत सांगतो. पण भारतात राजकीय लाभासाठी पाकिस्तानला लक्ष्य करण्यात येते. नरेंद्र मोदी सरकारनेही हेच केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेकरिता चर्चा करण्याचा प्रस्ताव अनेकदा दिला आहे. पण याकरिता भारताने काश्मीरसाठी घेतलेले निर्णय मागे घेण्याची गरज असल्याचे मजीद यांनी म्हटले आहे. त्यांचा रोख कलम 370 हद्दपार करण्याच्या निर्णयाच्या दिशेने होता.

चर्चेचा सूर का?

इम्रान यांच्यासह विदेश मंत्री कुरैशी आणि आता अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूतही भारताशी चर्चेचा सूर आळवू लागले आहेत. याचे सर्वात मोठे कारण एफएटीएफ म्हणजेच फायनान्शियल ऍक्सन टास्क फोर्सची बैठक आहे. या बैठकीत पाकिस्तानला ग्रे मधून ब्लॅक लिस्टमध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. हा निर्णय घेतला गेल्यास पाकिस्तान दिवाळखोर होऊ शकतो. ही स्थिती टाळण्यासाठी पाकिस्तानने धडपड चालविली आहे.

Related Stories

अफगाणिस्तान संघर्षात 34 जणांचा मृत्यू

Omkar B

राष्ट्राध्यक्ष पदासाठी ट्रम्प यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा

datta jadhav

‘टिकटॉक’चा ओरॅकलसोबतचा करार पूर्ण

datta jadhav

चीनच्या चार कंपन्यांकडून होणारी आयात अमेरिकेने रोखली

datta jadhav

10 हजारांहून अधिक उंटांना मारले जाणार

Patil_p

अमेरिका : ट्रम्प यांचे नवे विधान

Omkar B
error: Content is protected !!