तरुण भारत

दिशा रवीला 1 दिवसाची पोलीस कोठडी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

टुलकिट प्रकरणातील आरोपी दिशा रवी हिला येथील पतियाळा न्यायालयाने 1 दिवसाची अतिरिक्त पोलीस कोठडी दिली आहे. यापूर्वी तिला तीन दिवसांची कोठडी देण्यात आली होती. या कोठडीचा कालावधी सोमवारी संपत होता. पोलिसांनी तिला न्यायालयात उपस्थित करून आणखी पाच दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने एक दिवसाची कोठडी दिली.

दिशा रवी हिला बेंगळूरमधून गेल्या आठवडय़ात अटक करण्यात आली होती. विदेशातील कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने सध्या सुरू असणाऱया शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केले होते. या ट्विट सोबत तिने भारतात आंदोलनांचा भडका उडवून देण्याचा कार्यक्रम असणारे एक टुलकिट प्रसारित केले होते. हे टुलकिट भारतात दिशा रवी, निकिता जेकब व मुळुक यांनी तयार केले होते, असा पोलिसांचा आरोप आहे. याच कारणासाठी दिशा रवीला अटक करण्यात आली. तर जेकब आणि मुळुक याना तात्पुरता जामीन मिळाला आहे.

उच्च न्यायालयात आज निर्णय

रवी हिने दिल्ली उच्च न्यायालयातही अटकेविरोधात याचिका सादर केली आहे. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून निर्णय आज मंगळवारी होणार आहे. या निर्णयावर तिला जामीन मिळणार की नाही हे ठरणार आहे. तोपर्यंत तिला पोलीस कोठडीत रहावे लागणार नाही. तिने थनबर्ग हिला पाठविलेले काही व्हॉट्स् अप संदेश संशयाच्या घेऱयात असून तिच्या टुलकिटला जोडल्या गेलेल्या लिंकस् खलिस्तान समर्थकांच्या आहेत. त्यामुळे तिची भूमिका संशयास्पद आहे, असे पोलिसांचे म्हणणे असून यावरच मंगळवारी निर्णय दिला जाणार आहे.

Related Stories

बीआरओने रचला इतिहास

Patil_p

मिजोरममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

pradnya p

सिनेमागृहे, व्यायामशाळा सुरू करण्याचा विचार

Patil_p

देशातील रूग्णसंख्या 37 हजार 412

Patil_p

चिंताजनक! : पंजाबमध्ये 81 टक्के सॅम्पलमध्ये आढळला ब्रिटनचा स्ट्रेन

datta jadhav

पुड्डुचेरीत पहिल्यांदाच भाजप सत्तेच्या शर्यतीत

Patil_p
error: Content is protected !!