तरुण भारत

पतंजलीच्या कोरोनिलला ‘आयएमए’चा आक्षेप

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना फटकारले – रामदेव बाबा पुन्हा अडचणीत येणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

रामदेव बाबा यांची पतंजली आयुर्वेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पतंजलीच्या कोरोना लसीच्या ‘कोरोनिल’ला पाठिंबा दिल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना फटकारले आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) नियमांनुसार कोणताही डॉक्टर कोणत्याही औषधाला प्रोत्साहन देऊ शकत नाही, असे आयएमएने सोमवारी सांगितले. तसेच हर्षवर्धन स्वतः डॉक्टर असून त्यांनी नियमांच्या विरोधात काम केले असल्याचे सांगत त्यांच्याकडून खुलासाही मागितला आहे. यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनिल औषधाबाबत पतंजलीचे दावे फेटाळले आहेत.

योगगुरु बाबा रामदेव यांनी 19 फेब्रुवारी रोजी कोरोनिल हे कोरोनाप्रतिबंधक औषध लाँच केले होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितीन गडकरी हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘पतंजली’च्या वतीने भारत सरकार तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळाली आहे, असा दावा केला होता. रोगप्रतिरोधक क्षमता वाढविण्यासाठी आणि कोरोना नियंत्रित करण्यासाठी ‘कोरोनिल’ खूप प्रभावी आहे, असा दावाही रामदेव यांनी केला आहे. या दाव्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यापाठोपाठ आता ‘आयएमए’नेही आक्षेप घेतल्याने रामदेवबाबा यांच्यासमोरील चिंता वाढल्या आहेत.

औषध प्रमाणित केले नाही – डब्ल्यूएचओ

पतंजलीच्या दाव्यावर, कोविड-19 च्या उपचारांसाठी अशा कोणत्याही पारंपरिक औषधाचे परीक्षण केले नाही किंवा प्रमाणपत्रही दिलेले नाही, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. डब्ल्यूएचओने पतंजलीच्या कोरोनिलचे नाव घेतलेले नसले तरी ट्विटद्वारे स्पष्टीकरण मागितले आहे. कोरोनिलला भारत सरकार आणि डब्ल्यूएचओची मान्यता मिळाली आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी उद्घाटन कार्यक्रमात केला होता. आम्ही वैज्ञानिक पुराव्यांसह 150 देशांमध्ये कोरोनिलची औषध विक्री करणार आहोत, असेही ते म्हणाले होते.

यापूर्वीही औषधाला वादाची किनार

कोरोनिल औषध लाँच केल्यानंतर रामदेव बाबा अडचणीत येणार असल्याचे समजत आहे. याअगोदरही अशाचप्रकारे रामदेव बाबा यांनी कोरोनावर प्रभावी औषध आहे, असे सांगून इतर वैद्यकीय संशोधकांच्या अगोदर एक औषध लाँच करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याला केंद्रीय आरोग्य विभागाने मान्यता दिली नसल्याचे समोर आले होते. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने देखील त्यांच्या औषधाला अद्यापही मान्यता दिलेली नाही. त्यामुळे रामदेव बाबा पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

Related Stories

भारतात मागील 24 तासात 19,148 नवे कोरोना रुग्ण, 434 मृत्यू

pradnya p

वर्षाअखेरीस भारतात दाखल होणार S-400 मिसाईल

datta jadhav

शेतकरी-सरकारमध्ये पाचवी बैठक सुरू; कायदा मागे घेण्यावर शेतकरी ठाम

datta jadhav

भारताच्या मदतीसाठी आता अमेरिकन फौजा

datta jadhav

इराणमध्ये अडकलेले 234 भारतीय मायदेशी परतले

tarunbharat

गुजरातमध्ये काँग्रेस नेत्याचा कोरोनाने मृत्यु

Patil_p
error: Content is protected !!