तरुण भारत

26 रोजी भारत बंदची हाक

व्यापाऱयांच्या संघटनेकडून आवाहन – अनेक संघटनांचा पाठिंबा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

व्यापाऱयांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) कडून वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) तरतुदींच्या आढाव्याच्या मागणीवरून 26 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या दिवशी देशभरातील सर्व व्यावसायिक बाजारपेठा बंद असतील, असा दावा संघटनेने केला आहे.

26 फेब्रुवारी रोजी देशभरातील 8 कोटी पेक्षा अधिक व्यापारी संपावर जाणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. संघटनेच्या नेतृत्वाखाली जीएसटीतील काही तरतुदी मागे घेणे तसेच ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर बंदी घालण्याच्या मागणीवरून भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे.

देशातील वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनने यापूर्वीच कैटच्या व्यापार बंदला समर्थन देण्यासह त्यादिवशी वाहतुकीचा चक्काजाम करण्याचीही घोषणा केली आहे. याचबरोबर मोठय़ा संख्येत अनेक राष्ट्रीय व्यापारी संघटनांनीही व्यापार बंदला पाठिंबा दर्शविला असून यात ऑल इंडिया एफएमसीजी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन, फेडरेशन ऑफ ऍल्युमिनियम यूटेंसिलस मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन, नॉर्थ इंडिया स्पाइसिस ट्रेडर्स असोसिएशन, ऑल इंडिया वुमन एंटेरप्रिनियर्स असोसिएशन, ऑल इंडिया कॉम्प्युटर डिलर असोसिएशन, ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन इत्यादींचा समावेश आहे.

Related Stories

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी मोदी सरकारचा तीन टप्प्यांचा मास्टर प्लॅन

prashant_c

मुंबईतच देशातील 23 टक्के बळी

Patil_p

डीडीसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट : मुकेश सिंह

pradnya p

इंदू मिलवरुन राजकारण करु नये : उध्दव ठाकरे

pradnya p

जगभरात 23 लाख 31 हजार कोरोनाबाधित

prashant_c

कोरोना प्रतिबंधक लस 2021 पूर्वी उपलब्ध होणे अशक्य : WHO

datta jadhav
error: Content is protected !!