तरुण भारत

मानांकनात जपानची ओसाका दुसऱया स्थानी

वृत्तसंस्था/ पॅरीस

मेलबोर्नमध्ये गेल्या शनिवारी ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे अजिंक्यपद मिळविणारी जपानची 23 वर्षीय महिला टेनिसपटू नाओमी ओसाकाने सोमवारी घोषित करण्यात आलेल्या महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने आपले अग्रस्थान कायम राखले आहे.

जपानच्या ओसाकाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत आतापर्यंत चार ग्रण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. शनिवारी ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत  ओसाकाने अमेरिकेच्या ब्रॅडीचा सरळ सेट्समध्ये पराभव करून गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत दुसऱयांदा ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. या कामगिरीमुळे महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत ओसाकाने रूमानियाच्या हॅलेपला खाली खेचत दुसरे स्थान काबीज केले आहे.

महिला टेनिसपटूंच्या ताज्या मनांकन यादीत ऑस्ट्रेलियाची बार्टी 9186 गुणांसह पहिल्या, जपानची ओसाका 7835 गुणांसह दुसऱया, रूमानियाची हॅलेप 7255 गुणांसह तिसऱया, अमेरिकेची केनिन 5760 गुणांसह चौथ्या, युक्रेनची स्विटोलिना 5370 गुणांसह पाचव्या, झेकची प्लिसकोव्हा 5205 गुणांसह सहाव्या, अमेरिकेची सेरेना विल्यम्स 4915 गुणांसह सातव्या, बेलारूसची साबालेन्का 4810 गुणांसह आठव्या, कॅनडाची अँड्रेस्क्यू 4735 गुणांसह नवव्या तर झेकची क्विटोव्हा 4571 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

Related Stories

आज वास्कोत रंगणार चेन्नईन एफसी-जमशेदपूर यांच्यात लढत

Omkar B

बिग बॅश स्पर्धेत बेअरस्टोचे पदार्पण

Patil_p

गुड न्यूज : अनुष्का-विराट आई-बाबा बनणार !

pradnya p

नेटिझन्सना भावले सुर्यकुमारचे औदार्य

Omkar B

भारतीय महिला हॉकी संघ पुनरागमनास सज्ज

Patil_p

लंकेच्या शनाकाचे प्रयाण लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!