वृत्तसंस्था/ लंडन
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात मँचेस्टर सिटी संघाने अर्सेनलचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव करत जेतेपदाकडे आपली वाटचाल केली आहे.
या सामन्यात अर्सेनलच्या खेळाडूंनी मँचेस्टरच्या रहीम स्टर्लिंगवर शेवटपर्यंत नजर ठेवत त्याला जखडून ठेवले होते. दरम्यान खेळाला प्रारंभ झाल्यानंतर 45 व्या सेकंदाला स्टर्लिंगने मँचेस्टर सिटीचे खाते उघडले. स्टर्लिंगने हा गोल रियादच्या पासवर हेडरद्वारे नोंदविला. विविध स्पर्धांमध्ये मँचेस्टर सिटीचा हा सलग 18 वा विजय आहे. प्रिमियर लीग स्पर्धेच्या गुणतक्त्यात मँचेस्टर सिटीने 25 सामन्यांतून 59 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. आता ते आपल्या नजिकच्या संघापेक्षा 10 गुणांनी आघाडीवर आहेत. अर्सेनल दहाव्या स्थानावर आहे.