तरुण भारत

रशियाचा मेदवेदेव्ह मानांकनात तिसऱया स्थानी

वृत्तसंस्था/ पॅरीस

एटीपी टूरवरील पुरूष टेनिसपटूंच्या सोमवारी घोषित करण्यात आलेल्या ताज्या मानांकन यादीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हने पहिल्यांदाच तिसऱया स्थानावर झेप घेतली आहे. त्याचप्रमाणे रशियाचा कारात्सेव्ह याने मानांकनात 42 व्या स्थानावर झेप घेतली आहे. यापूर्वी तो 114 व्या स्थानावर होता. सर्बियाचा जोकोव्हिच याने आपले अग्रस्थान कायम राखले आहे.

मेलबर्नमध्ये नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोव्हिचने पुरूष एकेरीचे जेतेपद मिळविले. जोकोव्हिचने या स्पर्धेत आपली मक्तेदारी कायम राखली आहे. जोकोव्हिचच्या टेनिस कारकीर्दीतील हे 18 वे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत रशियाच्या मेदव्हेदेवने उपविजेतेपद मिळविले आहे.

एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सर्बियाचा जोकोव्हिच 12030 गुणांसह पहिल्या, स्पेनचा नदाल 9850 गुणांसह दुसऱया, रशियाचा मेदव्हेदेव 9735 गुणांसह तिसऱया, ऑस्ट्रीयाचा थिएम 9125 गुणांसह चौथ्या, स्वीसचा फेडरर 6630 गुणांसह पाचव्या, ग्रीकचा सित्सिपस 6595 गुणांसह सहाव्या, जर्मनीचा व्हेरेव्ह 5615 गुणांसह सातव्या, रशियाचा रूबलेव्ह 4609 गुणांसह आठव्या, अर्जेंटिनाचा शुवार्त्झमन 3480 गुणांसह नवव्या आणि इटलीचा बेरेटेनी 3480 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. रशियाच्या कारात्सेव्हने 1382 गुणांसह पहिल्यांदा 42 वे स्थान मिळविले आहे. त्याचे मानांकन 72 अंकांनी वधारले आहे.

Related Stories

संदीप चौधरीने उत्तेजक चाचणी टाळली

Patil_p

कसोटी क्रमवारीत केन विल्यम्सनची अग्रस्थानावर झेप

Patil_p

शेफाली वर्मा मानांकनात दुसऱया स्थानी

Patil_p

केनियाच्या कँडीचा नवा विश्वविक्रम

Patil_p

अर्थसंकल्पात क्रीडापटूंचा गौरव, मात्र तरतुदीत कपात

Patil_p

मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा धक्का

Patil_p
error: Content is protected !!