तरुण भारत

मुष्टियोद्धा विजेंदर सिंग पुढील महिन्यात रिंगणात

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताचा अपराजित व्यावसायिक मुष्टियोद्धा विजेंदर सिंग तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर पुढील महिन्यात रिंगणात पुनरागमन करणार आहे. व्यावसायिक मुष्टियुद्धात उतरल्यानंतर विजेंदर अपराजित राहिला असून हीच विजयी घोडदौड यावेळी देखील कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. विजेंदरचा प्रतिस्पर्धी कोण असेल, हे अद्याप निश्चित होणे बाकी आहे. ही लढत भारतातच होईल, इतकेच तूर्तास स्पष्ट केले गेले आहे.

Advertisements

‘प्रतिस्पर्धी कोण असावा, कोणत्या दिवशी ही लढत आयोजित करावी आणि ठिकाण कोणते असावे, यावर या लढतीचे आयोजक निर्णय घेणार आहेत. मात्र, विजेंदर मार्चमधील या लढतीत निश्चितपणे खेळणार आहे. विजेंदर 12-0 (8 नॉकआऊट विजय) ही विजयी घोडदौड येथेही कायम राखण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल’, असे विजेंदरच्या प्रवर्तकाने अधिक तपशील देताना नमूद केले.

विजेंदर हा विद्यमान डब्ल्यूबीओ ओरिएन्टल व डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन असून यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये त्याने घानाच्या माजी राष्ट्रकुल विजेत्या चार्ल्स ऍडमूचा दुबईत पराभव करत आपला सलग 12 वा विजय नोंदवला होता. त्यानंतर मात्र त्याने एकही लढत लढलेली नाही. मार्चमध्ये रिंगणात उतरेल, त्यावेळी विजेंदरसाठी ही भारतातली पाचवी लढत असेल. यापूर्वी, नवी दिल्ली, मुंबई व जयपूर येथील लढतीत प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारण्यात त्याला यश प्राप्त झाले आहे.

कोटस

मी पुन्हा रिंगमध्ये उतरण्यासाठी उत्सुक आहे. इतका प्रदीर्घ काळ रिंगपासून दूर राहणे कठीण होते. पण, या कालावधीत मी तंदुरुस्तीवर कठोर मेहनत घेतली. पुढील लढतीत प्रतिस्पर्धी कोण असेल, हे अद्याप निश्चित नाही. पण, मला व्यक्तिशः याचा फारसा फरक पडत नाही. मी केवळ विजयी घोडदौड कायम राखण्याच्या निर्धारानेच रिंगमध्ये उतरणार आहे.

-भारताचा व्यावसायिक मुष्टियोद्धा विजेंदर सिंग.

Related Stories

सचिन पहिल्या मारुती 800 कारच्या शोधात!

Patil_p

जोकोव्हिच, फेडरर, नदाल एटीपी पुरस्कार विजेते

Patil_p

पहिल्या कसोटीत लंकेची स्थिती मजबूत

Patil_p

दुखापतीमुळे सुशील कुमारची चाचणी स्पर्धेतून माघार

Patil_p

गोलंदाजांच्या हाराकिरीनंतर हार्दिक पंडय़ाची झुंज निष्फळ

Patil_p

टोकियोतील महिला टेनिस स्पर्धा रद्द

Patil_p
error: Content is protected !!