तरुण भारत

श्रीलंकेचा लाहिरु कुमारा कोरोनाबाधित

कोलंबो / वृत्तसंस्था

श्रीलंकन क्रिकेट संघातील मध्यमगती गोलंदाज लाहिरु कुमाराला कोरोनाची लागण झाली असून यामुळे मार्चमध्ये विंडीज दौऱयात तो सहभागी होऊ शकणार नाही. श्रीलंकन क्रिकेट मंडळाने सोमवारी ही माहिती दिली. विंडीज दौऱयात लाहिरु कुमाराची जागा सुरंगा लकमल घेईल, अशी शक्यता आहे. 

Advertisements

‘विंडीजविरुद्ध मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेच्या पार्श्वभूमीवर, सर्व खेळाडूंची पीसीआर चाचणी घेतली गेली. त्यात लाहिरु कुमारा कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले’, असे लंकन मंडळाने नमूद केले. या महिन्याच्या प्रारंभी, मुख्य प्रशिक्षक मिकी ऑर्थर व आघाडी फळीतील फलंदाज लाहिरु थिरिमने हे देखील कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यापूर्वी, बिनुरा फर्नांडो व चमिका करुणारत्ने हे सीमर्स मागील महिन्यात कोरोनाग्रस्त झाले होते.

लाहिरुचा अपवाद वगळता सध्याच्या संघातील अन्य कोणत्याही खेळाडूची चाचणी पॉझिटिव्ह आलेली नाही. मात्र, अलीकडेच संपन्न झालेल्या सराव सामन्यात हे सर्व खेळाडू एकत्रित खेळले असल्याने एकूण लंकन गोटातच चिंतेची लाट उमटली आहे. लंका-विंडीज यांच्यात पहिली टी-20 दि. 4 मार्च रोजी खेळवली जाणे अपेक्षित आहे. उभय संघात मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर कसोटी क्रिकेटही खेळवले जाणार आहे.

Related Stories

रोहितचे तुफान, मुंबई इंडियन्सची बाजी

tarunbharat

भारताचे फ्रीस्टाईल मल्ल पात्रतेविना माघारी

Patil_p

मुंबई-बेंगळूर लढतीने आयपीएलचा प्रारंभ होणार

Patil_p

आयपीएलचे हंगामी वेळापत्रक तयार

Patil_p

लवारबाजीत भवानी देवी राष्ट्रीय विजेती

Patil_p

माजी स्पिनर चंद्रशेखर इस्पितळात

Patil_p
error: Content is protected !!