तरुण भारत

उमेश यादव तंदुरुस्ती चाचणीत ‘उत्तीर्ण’

अहमदाबाद / वृत्तसंस्था

मध्यमगती गोलंदाज उमेश यादवने तंदुरुस्ती चाचणी पार केली असून इंग्लंडविरुद्ध तिसऱया कसोटी सामन्यासाठी त्याचा भारतीय संघात समावेश केला गेला आहे. पर्यायी गोलंदाज शार्दुल ठाकुरला आता सध्या सुरु असलेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय संघातून मुक्त केले गेले. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी उद्यापासून (बुधवार दि. 24) येथे खेळवली जाणार आहे. ही लढत दिवस-रात्र असेल.

‘उमेश यादवची रविवारी मोटेरा स्टेडियमवर तंदुरुस्ती चाचणी झाली आणि त्यात तो उत्तीर्ण झाला आहे. यानंतर त्याचा भारतीय संघात समावेश झाला आहे’, असे बीसीसीआयने ईमेलद्वारे नमूद केले. शार्दुल ठाकुर आता विजय हजारे चषक स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधीत्व करेल. उमेश यादव यापूर्वी डिसेंबरमध्ये मेलबर्न कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झाला व त्या मालिकेतूनही तो बाहेर फेकला गेला होता. भारत-इंग्लंड यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे.

शेवटच्या दोन कसोटींसाठी भारतीय संघ ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पंडय़ा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

Related Stories

ब्रिटीश ग्रां प्रि शर्यत प्रेक्षकविना होणार

Patil_p

बांगलादेशचे विंडीजला 395 धावांचे आव्हान

Patil_p

हॉकी प्रशिक्षक सोर्द मारिने यांची लेखनप्रपंचाकडे गरुडझेप!

Patil_p

सिंगापूर, जपान, अझरबैजान ग्रां प्रि शर्यती रद्द

Patil_p

एफसी गोवाची जमशेदपूरवर मात, इगोर अँग्युलोचे दोन गोल

Omkar B

टॉप सीडेड टेनिसपटूंचे आव्हान समाप्त

Patil_p
error: Content is protected !!