तरुण भारत

चमिंडा वासचा 3 दिवसातच प्रशिक्षकपदाचा राजीनामा

कोलंबो / वृत्तसंस्था

लंकेचा माजी महान जलदगती गोलंदाज चमिंडा वासने अवघ्या तीन दिवसातच राष्ट्रीय संघाच्या जलद गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. लंकन क्रिकेट मंडळाशी मानधनाच्या मुद्यावरुन मतभेद झाल्यानंतर त्याने तडकाफडकी हा निर्णय घेतला. वासची अवघ्या तीनच दिवसांपूर्वी जलद गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. पण, त्यानंतर झालेल्या चर्चेत वासच्या मागण्या लंकन मंडळाने धुडकावून लावल्या. त्याची परिणती वासने राजीनामा देण्यात झाली. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, वास लंकन संघासमवेत सोमवारी रात्री विंडीजकडे रवाना होणार होता. वासने याचवेळी लंकन क्रिकेट अकादमी प्रशिक्षकपदाचाही राजीनामा सुपूर्द केला आहे. 355 कसोटी बळी व 400 वनडे बळींसह वास हा लंकेच्या काही सर्वात यशस्वी जलद गोलंदाजांमध्ये गणला जातो.

Related Stories

विश्व सांघिक टेनिसमध्ये व्हिनस दाखल

Patil_p

ऋषभ पंतऐवजी साहाला संधीची शक्यता

Patil_p

मँचेस्टर सिटीचा निसटता विजय

Patil_p

राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीत सेहवाग, सरदार सिंग

Patil_p

नदाल, मेदवेदेव्ह, प्लिस्कोव्हा, हॅलेपची आगेकूच

Patil_p

सेहवाग म्हणतो, शास्त्रींना सद्यस्थिती माहीत नाही, असे होऊच शकत नाही!

Omkar B
error: Content is protected !!