तरुण भारत

साखरपुडय़ाच्या कार्यक्रमातून 14 तोळे लंपास

प्रतिनिधी/ कराड

येथील पंकज लॉनमधे रविवारी आयोजित साखरपुडय़ाच्या कार्यक्रमातून तब्बल साडेचार लाखांच्या 14 तोळे दागिन्यांवर चोरटय़ांनी डल्ला मारला. याप्रकरणी सौ. सविता सुधीर पाटील (वय 41) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. सौ. पाटील या नियोजित वधू-वरासमवेत फोटो काढण्यासाठी गेल्यावर अवघ्या दहा मिनिटात त्यांची दागिन्यांची पर्स गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.  

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सविता पाटील या कुटुंबासह  वारूंजी विमानतळ येथे राहतात. पाटील यांचे पती सुधीर पाटील दक्षिण आफ्रिका येथे कामानिमित असतात. सविता पाटील यांचे स्वतःचे मेडीकल आहे. दोन वर्षापूर्वी त्यांनी 12 तोळे वजनाच्या सोन्याच्या सहा बांगडय़ा, 1 तोळे वजनाचे आई-भाऊ लिहलेले ब्रेसलेट खरेदी केले होते. 21 फेब्रुवारी रोजी सविता पाटील यांच्या नणंदेच्या मुलाचा साखरपुडा पंकज हॉटेल येथे होता. मुलगा आयुष याच्यासोबत त्या साखरपुडय़ाला गेल्या होत्या. सौ. पाटील यांनी सोन्याच्या बांगडय़ा व ब्रासलेट पर्समध्ये ठेवले होते. साखरपुडय़ाचा कार्यक्रम चालू असताना पाटील यांच्या नणंदेची

मुलगी ऋतुजा साळुंखे तिच्या भावाची जुनी अंगठी घेऊन आली. अंगठी तुमच्या पर्समध्ये ठेवा, असे तिने सविता पाटील यांना सांगितले. त्यांनी अंगठी पर्समध्ये ठेवली.

साखरपुडय़ाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी पाटील यांनी पर्स एका सोफ्यावर ठेवली व फोटो काढण्यासाठी गेले. फोटो काढून  परतल्यावर  पर्स सोफ्यावरून गायब असल्याचे दिसले. पै पाहुण्यांना त्यांनी पर्सबाबत विचारणा केली मात्र कोणालाच काही माहिती नसल्याचे समोर आले. पर्स चोरीस गेल्याची त्यांची खात्री पटली. पर्समधे चार लाख वीस हजारांचे बारा तोळे वजनाच्या जाळी व फुले असलेल्या डिझाईनच्या सहा बांगडय़ा, 35 हजार रूपये किमतीच्या एक तोळे वजनाचे आई भाऊ लिहलेले ब्रेसलेट, 25 हजार रूपये किमतीची सात ग्रॅम वजनाची लाल खडा असलेली अंगठी होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Related Stories

सातारा : पालीत वऱ्हाडी मंडळी,मोजक्या ग्रामस्थांनीच केला सदानंदाचा येळकोट

triratna

अपुऱ्या कामामुळे निकमवाडी येथील रस्ता बनला धोकादायक

triratna

जिहे गावावर आता पोलिसांनी ठेवला ड्रोनचा वॉच

Patil_p

पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच

Patil_p

‘तात्यांचा ठोकळा’चे शाहू महाराजांच्या हस्ते प्रकाशन

Shankar_P

पैशासाठी मुलानेच केला पित्याचा खून

Amit Kulkarni
error: Content is protected !!