तरुण भारत

घाटाई देवी देवराई परिसरात 30 पिशव्या कचरा केला गोळा

राजू भोसले यांनी स्वच्छता मोहीम राबवत उचलला  कचरा

वार्ताहर / कास

 सातारा तालुक्यासह जिह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घाटाई देवी मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पार्टी बहाद्दरांकडून जेवणावळी आणि दारु पाटर्य़ा सुरू होते यामुळे देवस्थान परिसराचे पावित्र्य धोक्यात येऊ लागल्याने भाविकांमध्ये रोषाचे वातावरण निर्माण झाले होते दैनिक तरुण भारत ने सविस्तर रोखठोक वृत्त प्रकाशित केले होते याची दखल घेऊन देवीवर श्रद्धा असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भैया भोसले मित्र समूहाच्या वतीने घाटाईदेवी मंदिर परिसरात 21 फेब्रुवारी रोजी स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जवळजवळ तीस पोती कचरा बाटल्या जमा करून परिसर कचरा आणि प्लास्टिक मुक्त करण्यात आला

आहे.

  घाटाई देवी मंदिर कास पठाराच्या पश्चिमेस निसर्गरम्य वातावरण आणि घनदाट वनराईत वसलेले आहे यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा ओघ कमी प्रमाणात पाहायला मिळतो परंतु अलीकडच्या काळात पाटर्य़ा करणायांचे प्रमाण या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत होते यामुळे या देवीच्या मंदिर परिसरातच ओल्या पाटर्य़ा होऊ लागल्याने जेवणावळी  व बाटल्यांचा खच दिसत होता. घाटाई हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून तालुक्यासह जिह्यासह राज्यात प्रसिद्ध आहे यामुळे मंदिराचे पावित्र्याला कोणत्याही प्रकारे धोका देऊ नये यासाठी घाटाई मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम राजू भैया भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी राजू भैया भोसले यांनी स्वतः परिसरातील कचरा गोळा केला तसेच तसेच त्यांच्या मित्र समूहाने जवळजवळ तीस पोती कचरा जमा करून या परिसराला कचरा आणि प्लास्टिक मुक्त केले यावेळी राजू भैया भोसले कास पठार वन समितीचे अध्यक्ष व सदस्य व कर्मचारी घाटाई देवस्थान  ट्रस्टचे विश्वस्त व राजू भैय्या मित्र समूह बहुसंख्येने उपस्थित होते तसेच अशा ओल्या पाटर्य़ा करणायांना संबंधितांनी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी राजू भैया भोसले यांनी दिल्या आहेत

Related Stories

कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वडगाव पोलिसांची दंगल काबू रंगीत तालीम

triratna

कृष्णा योजनेच्या पाईप लाईनला गळती

Shankar_P

पावसाच्या तुरळक सरींमुळे शेतकरी व ऊसमजूर हवालदिल

triratna

हातकणंगले येथे एकाच रात्री तीन घरफोड्या

Shankar_P

पूरग्रस्तांची घरे बांधून फेडरल बँकेने आदर्श उभा केला – मंत्री यड्रावकर

triratna

मोकाट कुत्र्याने घेतला दोन मुलांचा चावा

triratna
error: Content is protected !!