तरुण भारत

विनाराडा दोन्ही राजांची भेट

प्रतिनिधी/ सातारा

खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गेल्या दोन वर्षातील भेटी सर्वज्ञात आहेत. दोन वर्षापूर्वी झालेल्या सुरुची राडय़ानंतर ज्या ज्या वेळी दोन्ही राजे भेटले त्यावेळी राडा झाल्याच्या घटना ताज्या असताना सोमवारी उदयनराजे भोसले त्यांच्या मामाचा मुलगा आशिषराजे यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका घेऊन सुरुचीवर शिवेंद्रराजेंच्या भेटीला गेले. त्यावेळी पोलिसांसह कार्यकर्त्यांच्या मनात पाल चुकचुकली. परंतु हे दोन्ही राजे निमंत्रण पत्रिकाच्या निमित्ताने भेटले आणि मनसोक्त बोलले. त्यामुळे दोन्ही राजांची भेट विना राडा झाल्याची चर्चा संपूर्ण जिल्हय़ात झाली आणि कार्यकर्त्यांची मनेही मोहरुन गेली.

Advertisements

  राजकारणामुळे नाती दुरावातात अन् जुळतात देखील. मात्र या सर्वांच्या पलिकडे जावून अचानकपणे एखादी कृती करुन सगळय़ांची मने जिंकण्याची खासदार उदयनराजे भोसले यांची खासियत कोणालाच जमत नाही. राजकारण अन् विकासाच्या पलिकडे जावून छत्रपती घराण्याचा वारसा असलेले सातारचे दोन्ही राजे एकत्र असावेत ही सातारकरांची नेहमीच भावना असते. सोमवारी सकाळी उदयनराजेंची स्वारी थेट सुरुची बंगल्यावर गेली आणि आमदार शिवेंद्रराजेची भेट घेतली.

सध्या खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये एकाच पक्षात असले तरी सातारचे राजकारण आले त्यांचे कार्यकर्ते त्यांना वाटून घेतात. त्यातून जे रणकंदन सातारकरांनी अनुभवले तेव्हापासून अनेक घटना राजकारणात घडून गेल्यात. मात्र, हे दोन्ही राजे कोणत्याही पक्षात असले तरी एकत्र असावेत ही सातारकरांची भावना नेहमीच असते.

जिल्हा बँक, सातारा पालिका निवडणुकीवर राजकारणात रणधुमाळी पेटलीय. नेतेमंडळींच्या वक्तव्याने वातावरण तापत असताना खासदार उदयनराजे यांनी दिल्लीसह राज्यात मुख्यमंत्र्यांना भेटत संपर्क सुरुच ठेवलाय. तर शिवेंद्रराजे देखील उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटून आलेत. ग्रेड सेपरेटर कामावरुन श्रेयवादही रंगलेला सर्वजण पहात होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेसकडून हालचाली सुरु आहेत.

या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी खासदार उदयनराजेंच्या काळय़ा रंगाच्या महागडय़ा कारने थेट सुरुचीचा रस्ता धरला. सुरुचीवर आमदार शिवेंद्रराजेंना भेटण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होतीच. त्यातच अचानकपणे उदयनराजेंच्या गाडीची एंट्री झाली. गाडीतून नेहमीच्या दिमाखदार स्टाईलमधून उदयनराजे उतरले आणि शिवेंद्रराजेंच्या दिशेने गेले. शिवेंद्रराजेंनी देखील थोरल्या भावाचा मान राखत त्यांना अभिवादन केले.

उपस्थितांच्या मनात प्रचंड उत्सुकता ताणली गेली होती. खूप दिवसांनी दोन्ही भाऊ सार्वजनिकपणे एकमेकांना भेटत होते. उदयनराजेंनी संवाद साधत त्यांच्या मामाचा मुलगा अतिषराजे यांच्या लग्नाच्या निमंत्रणाची पत्रिका दिली. हे लग्न नाशिकमध्ये होणार आहे. यावेळी काही हितगुज साधल्यानंतर उदयनराजे सर्वांना अभिवादन करत रवानाही झाले. मात्र काही वेळाच्या या दोन्ही राजांच्या भेटीची व्हिडिओ चित्रफित सोशल मिडियावर व्हायरल झाली अन् ती भेट अनुभवणाऱयांसह सर्व सातारकरांची मने या भेटीने मोहरुन गेली.

प्रसन्न चेहऱयांनी मारल्या गप्पा

खासदार उदयनराजे भोसले यांचा 24 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी असते. राजेंचा मूडही खूप प्रसन्न होता. सुरुचिवर आल्यानंतर त्यांची देहबोलीही उपस्थितांना सुखावणारी होती. दोन्ही राजे भेटले अन् कार्यकर्त्यांनी या क्षणांचे उत्साहाने व्हिडिओ चित्रण केले. प्रसन्न चेहऱयाने दोघांनीही काही वेळ साधलेला संवाद सर्वांसाठी सुखावणारा ठरला अन् राजे भेटले ही देखील सर्वांसाठी खास बातमी ठरली.

Related Stories

50 रूग्णांची झाली ऍटीबॉडी टेस्ट

Patil_p

पॉझेटिव्हीटी रेट खाली पण थंडी वाढली

Patil_p

तृतीय पंथीयाचा पोलीस भरतीसाठी साताऱयात सराव सुरु

Patil_p

गांजाचे कलेक्शन सांगोल्यापर्यत, दीड किलो गांजा जप्त,आणखी चार अटकेत

Shankar_P

शिरोली गावाला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्या

Shankar_P

अदर पूनावाला धमकी प्रकरणावर संजय राऊत म्हणाले…

triratna
error: Content is protected !!