तरुण भारत

आदर्श शाळा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार ऑनलाईन

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जाहीर झालेल्या आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, केंद्रप्रमुख पुरस्कारांचे वितरणाचा आज 23 फेब्रुवारी होणारा कार्यक्रम वाढत्या कोरोनामुळे रद्द करावा लागला आहे. तो प्रत्यक्ष न होता ऑनलाईन च्या माध्यमातून होणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

  हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी 11 वाजता जि.प.येथील लोकनेते कै. शामराव पेजे सभागृह येथे आयोजित केला आहे. पण जिल्हाभरात कोरानाची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. हे संकट लक्षात घेता शासनाकडूनही सार्वजनिक कार्यक्रम, सभा, मोर्चे अशा सर्वांवर बंधने घालण्यात आली आहेत.

  त्यामुळे आदर्श शिक्षक पुरस्कार, केंद्रप्रमुख पुरस्कार व आदर्श शाळा पुरस्कार वितरण कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. याबद्दल संबंधित शाळा (मागील आणि यावर्षीच्या) व संबंधितांना कळविण्यात यावे अशा सूचना सर्व गटशिक्षणाधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत.

Related Stories

कोरोनामुळे जिल्ह्य़ात साधेपणाने ईद साजरी

Patil_p

वेंगुर्ल्यातील कामांवर प्रशासनाचे दुर्लक्ष!

NIKHIL_N

सावंतवाडी : भाजप-शिवसेनेत सरळ लढत

NIKHIL_N

‘त्या’ युवकावर अखेर गुन्हा दाखल

triratna

आंबा वाहतुकीच्या वाहनातून चाकरमानी आणल्याने गुन्हा

NIKHIL_N

एका माध्यमाच्या ‘सिक्रेट’ शाळेतून विद्यार्थी पालकांवर दबाव

Patil_p
error: Content is protected !!