तरुण भारत

खेडमधील रूग्णांच्या स्वॅबची होणार जीनोम सिक्वेंस टेस्ट !

प्रतिनिधी/ रत्नागिरी

लंडन आणि आफ्रिकेमध्ये कोरोनाचा दुसरा स्ट्रेन (जीनोम सिक्वेंस) समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य क्षेत्रासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.  खेडमध्ये तीन चार दिवसातच 60 कोरोना रूग्ण आढळल्याने हा कोरोनाचा दुसरा स्टेन आहे का याची पडताळणी करण्यासाठी यातील 18 रूग्णांची जीनोम सिक्वेंस टेस्ट करण्यात येणार आहे. यासाठी पुण्यातील ‘एनआयव्ही’ची टीम रविवारी रत्नागिरीत स्वॅब घेण्यासाठी आली होती. ही टीम स्वॅब घेवून पुण्याला रवाना झाली. येत्या 15 ते 20 दिवसात याचा अहवाल शासनाच्या आरोग्य विभागाला सादर होणार आहे.

Advertisements

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची संख्या पुन्हा वेगाने वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. या आठवडय़ात ही संख्या झपाटय़ाने वाढल्याने हा कोरोनाचा दुसरा स्ट्रेन असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. लंडन आणि आफ्रिकेत कोरोनाचा जीनोम सिक्वेंस हा स्ट्रेन वाढल्याने महाराष्ट्रातील काही भागात या स्ट्रेनचीही तपासणी केली जात आहे. रत्नागिरी जिल्हय़ातील खेड येथील एका गावातच 3-4 दिवसात 55 हून अधिक रूग्ण आढळून आले आहेत. याठिकाणी पहिल्याच दिवशी एका वेळी तब्बल 27 रूग्ण आढळून आले होते त्यामुळे आरोग्य विभाग अधिक सावध झाला आहे. कोरोनाची अचानक उसळी होण्यामागे हा कोरोनाचा जीनोम सिक्वेंस स्ट्रेन आहे का याची पडताळणी करण्यासाठी पुण्यातील एनआयव्हीची टीम रत्नागिरीत दाखल झाली होते. याचा अहवाल थेट शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.  

डॉ. फुलेंनी कोरोना लसीचा दुसरा डोसही घेतला

कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसाच्या कालावधीत दुसरा डोस घ्यावा लागतो. हा दुसरा टप्पा गेल्या तीन दिवसापासून रत्नागिरीत सुरू करण्यात आला.  ही लस येथील झाडगांवमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येत आहे. सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दुसरा डोसही घेतला आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनापासून भक्कम संरक्षण उपलब्ध होत असल्याने यादीत नाव आल्यास त्वरीत लस घेण्याचे आवाहन डॉ.फुले यांनी केले आहे.

Related Stories

‘रत्नागिरी 8’ भात बियाण्यांची सहा राज्यांसाठी शिफारस

NIKHIL_N

कोकणातील काजू, मत्स्योद्योगाला बळकटी

Patil_p

चित्र रेखाटणारे हात राबू लागले शेतात!

Patil_p

रत्नागिरीत ‘महाराष्ट्र बंद’ ला संमिश्र प्रतिसाद

Patil_p

लॉकडाऊन काळात शालेय फी जमा करण्यासाठी सक्ती करू नये – वर्षा गायकवाड

Abhijeet Shinde

हर्णैत खडपात पडून मच्छीमाराचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!