तरुण भारत

महाराष्ट्रात सोमवारी 5,210 नवीन कोरोनाबाधित

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाबाधित नवीन रुग्णांची आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 5 हजारांपेक्षा अधिक होती. मागील 24 तासात 5,210 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 21 लाख 06 हजार 094 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 806 एवढा आहे. 

कालच्या एका दिवसात 5,035 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 19 लाख 99 हजार 982 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 53 हजार 113 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.96% इतके आहे. 

  • मुंबई : 3 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!


मुंबईत कालच्या दिवसात 760 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 4 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 634 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,19,888 वर पोहचली आहे. तर 3,00,180 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,446 इतकी आहे. सद्य स्थितीत 7 हजार 397 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

Related Stories

यंदा गणेश विसर्जन मिरवणूक नाहीच

Patil_p

दिलासादायक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 19,212 रुग्ण कोरोनामुक्त

pradnya p

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर, 1014 पॉझिटिव्ह, 12 जणांचा मृत्यू

triratna

सातारा : आरोग्य विभागावर वाढती जबाबदारी, नागरिकांचा सहभाग मोलाचा : डॉ. आठल्ये

triratna

आज 25 जणांना सोडले घरी ; 171 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

triratna

सातारमध्ये खुलेआम गुटखा विक्री

Patil_p
error: Content is protected !!