तरुण भारत

तपासकामात पोलिसांचा हलगर्जीपणा

बिगर सरकारी संस्थाचा आरोप : रामा काणकोणकर गाडी जळीत प्रकरण

प्रतिनिधी / पणजी

 सामाजीक कार्यकर्ता रामा काणोकोणर यांची चारचाकी गाडी जळविल्या महिना पूर्ण झाला तरी पेलिसांना गुन्हेगार का सापडत नाही असा प्रश्न काही बिगर सरकारी संस्थानी उपस्थित केला आहे. बेकायदेशीर प्रकल्पा विरोधात आवाज उठविणाऱया विरोधात सरकार काम करीत असून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारच्या दबवामुळेच पोलीस तपासकामत हलगर्जीपणा करीत आहेत. सरकारच्या या कृतीचा आम्ही निषेध करीत आल्याचेही त्यांनी सांगितले.

येथील आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परीषदेत रुपेश वेळीप यांनी वरील माहिती दिली आहे. त्यांच्या सोबत रामा काणकोणकर व त्यांचे कुटुंबीय, अरुणा वाघ तसेच इतर बिगर सरकारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 13 जानेवारी रोजी काणकोणकर यांच्या गाडीला अन्यताने आग लावली होती. याबाबत संबंधीत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. उपनिरीक्षकाने तक्रारीच्या तपास कामाला सुरुवात केली असता त्याची बदली करण्यात आली. नंतर या तक्रारीबाबत कोणतीच हालचाल होत नसल्याचे दिसून येत आहे. असेही वेळीप यांनी सांगितले.

रामा काणकोणकर यांनी सरकारवर खरपूस टीका करताना सांगितले की राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला पोचली आहे. अधिकाधिक पुरावे देऊनही सशयिताला पोलीस अजून अटक का करीत नाही. सरकारच्या दबावाखाली कामकरणाऱया पोलिसांवरचा सामान्य लोकांचा विश्वास उडाला आहे. या अगोदर आपल्यावर अनेकवेळा हल्ला करण्याचा प्रय़त्न करण्यात आला होता. आता आपली गाडी जाळून टाकण्यात आली. जे कुणी हे कृत्त करीत आहे त्यांना कदाचीत असे वाटेल की मी मानसीक रित्या खचून जाईल परंतु त्यांचा हा भ्रम असून उलट मी मानसीक रित्या आणखिन मजबूत झालो असल्याचे काणकोणकर यांनी सांगितले. ज्याज्यावेळी आपण कोणत्याही बेकायदेशीर प्रकल्पा विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला त्यात्यावेळी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. असेही काणकोणकर यांनी सांगितले.

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून उत्तर प्रदेश आणि गोवा यांच्यात काहीच फरक राहिलेला नाही. खून बल्तकार दिवसाढवळ्या होत आहेत. गुंडागीरी वाढत असून दिवसाढवळ्या पिस्तूल घेऊन फिरत आहेत. एखादी घटना घडली की  दोन दिवस एक फार्स करतात मग मात्र त्याचा काही पत्ताच नसतो विलास मेथर यांना दिवसाढवळ्या भर सरस्त्यावर जाळून मारण्यात आले या घटनेमागचा मास्टर माईंड पोलिसांना मिळाला का असा प्रश्न काणकोणकर यांनी उपस्थित केला आहे. आज जनतेने सरकारच्या विरोधात एकत्रीतपणे आवाज उठविणे जरुरीचे आहे असेही शेवटी काणकोणकर यांनी सांगितले.

Related Stories

प्रत्येक पिढीला चित्रपट प्रेरणा देतात

Amit Kulkarni

मडगावातील दोन्ही बाजारपेठांची नगराध्यक्षांकडून पाहणी

Omkar B

भारतीयांना मायभूमीत आणण्याच्या निर्णयाचे सावईकर यांच्याकडून स्वागत

tarunbharat

विधानसभा निवडणुकीसाठी आपची मोर्चेबांधणी सुरू

GAURESH SATTARKAR

केंद्राकडून मार्गदर्शकतत्त्वे आल्यानंतरच 10 वी, 12 वी अभ्यासक्रमाबाबत निर्णय

Patil_p

प्राणीमित्रांच्या जागृतीमुळे नागांचे बळी घटले

Omkar B
error: Content is protected !!