तरुण भारत

घन कचरा व्यवस्थापनासाठी फोंडा शहरात अभिनव प्रयोग

नेस्ले कंपनीच्या हिलदारी उपक्रमाशी फोंडा पालिकेचा करार : नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणार

प्रतिनिधी / फोंडा

Advertisements

फोंडा शहरातील घन कचरा व्यवस्थापनासाठी नेस्ले इंडिया कंपनीने अभिनव असा हिलदारी उपक्रम हाती घेतला असून त्यासंबंधी फोंडा पालिकेशी तीन वर्षांचा करार करण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात कंपनी अधिकाऱयांकडून पालिका मुख्याधिकारी प्रदीप नाईक यांनी हे करारपत्र स्वीकारले. यावेळी फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, उपनगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, कंपनीचे अधिकारी संजय भंडारी, प्रकल्पाचे समन्वयक तुषार तोंडगावकर व अन्य नगरसेवक उपस्थित होते.

फोंडा शहर उत्कृष्ट मॉडेल बनविण्याचा प्रयत्न

फोंडा पालिका व मुंबई येथील स्त्री मुक्ती संघटना यांच्या संयुक्त सहकार्याने फोंडा पालिका क्षेत्रात हा कचरा व्यवस्थापन प्रकल्प पुढील तीन वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. शहरातून गोळा होणाऱया घन कचऱयाचे चार प्रकारे विघटन होणार असून ओल्या कचऱयापासून खत उत्पादन तर सुक्या कचऱयाचा पुनर्वापर करून प्रदूषणांवर नियंत्रण ठेवतानाच वातावरणातील कर्ब उत्सर्ग कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे तुषार तोंडगावकर यांनी सांगितले. शहरातील आस्थापने व घराघरातून कचरा गोळा करताना त्यावर मॉनिटरींग सिस्टिम कार्यान्वित केली जाणार आहे. त्यासाठी विशेष कोड तयार करून ऑनलाईन पद्धतीने या प्रक्रियेचा पाठपुरावा केला जाईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून फोंडा शहर कचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट मॉडेल बनविण्याचा प्रयत्न असल्याचे तोंडगावकर यांनी सांगितले. फोंडा पालिकेचे मजूर व कामगारांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये कौशल्य विकास साधला जाईल. या व्यतिरिक्त कचरा उचलणाऱया मजुरांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी, त्यांना सुरक्षेसंबंधी उपकरणे व त्यांच्या कौटुंबीक व मुलांच्या शैक्षणिक गरजांकडेही लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

देशभरातील अकरा शहरांमध्ये हिलदारी उपक्रम कार्यरत

नॅस्ले कंपनीतर्फे देशभरातील अकरा शहरांमध्ये हा प्रकल्प राबविला जात असून मसूरी, नैनिताल, डलहौसी, महाबळेश्वर, कोनार्क, पोंडीचेरी या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा त्यात समावेश आहे. गोवा राज्यात फोंडा शहरात सर्वप्रथम हा प्रकल्प राबविला जात असून फोंडा हे राज्यातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याचा या प्रकल्पाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असल्याचे संजय भंडारी यांनी सांगितले. या प्रकल्पाअंतर्गत दर दिवशी 13 मॅट्रिक टन वर्गीकृत घनकचऱयावर शास्त्राrय पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. कचरा व्यवस्थापनातून महसूल निर्मिती व साधारण 105 कामगारांच्या सबलीकरणाचाही उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. शिवाय नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनासंबंधी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न होणार आहेत. नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी या नवीन प्रकल्पामुळे फोंडय़ात स्वच्छता, आरोग्य व सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने खूप मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली. नगरसेवक रितेश नाईक यांनीही या प्रकल्पाचे स्वागत करताना फोंडा शहरासाठी तो महत्त्वाचा ठरणार असल्याचे नमूद केले.

Related Stories

म्हादई विश्वासघातप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

Amit Kulkarni

वास्को शहर व परिसरात चौथ्या दिवशीही उत्स्फूर्त बंद

Patil_p

कांद्याचा दर वाढल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला आर्थिक चटके

Omkar B

पार्वतीनगर कुळण येथील महिलेच्या अपहरणाची तक्रार

Patil_p

सांगेतून 20 उमेदवारांचे अर्ज सादर

Amit Kulkarni

साळजिणी येथील रस्त्याची चाळण, लोक हैराण

Patil_p
error: Content is protected !!