तरुण भारत

कामगार आयोगाच्या कार्यालया समोर कंदबा कर्मचाऱयांचे उपोषण

प्रतिनिधी / पणजी

 कदंबा महामंडळाच्या कर्मचाऱयांचे गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबीत असलेल्या मागण्यासाठी केटीसी चालक व इतर कर्मचारीवर्ग संघटनेने आयटकच्या झेंडय़ाखाली येथली कामगार आयोग कार्यालया समोर सोमवारी एक दिवस उपोषण करून त्वरीत मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे. कंदबा महामंडळाचे व्यवस्थापन कर्मचाऱयांना केवळ झूलवत ठेवत आहेत. कित्येक दिवसांपासून कर्मचाऱयांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही. अखेर कर्मचाऱयांना उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागला असे कामगारनेते क्रिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितले. उपोषणाच्यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना क्रिस्तोफर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत शशिकांत गावकर, प्रसन्ना उत्तगी, अत्माराम गवस, चंद्रकांत चोडणकर, तसेच इतर कर्मचारीवर्ग मोठय़ा संखेने उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच वाहतूकमंत्री मावीन गुदीन्हो यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून कामगारांचे प्रश्न त्वरीत सोडवावे अशी मागणीही क्रिस्तोफर यांनी केली आहे

Related Stories

काणकोणातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

Patil_p

मडगाव रवींद्र भवनमध्ये आज ‘उटा’च्या नवीन समितीची स्थापना

Amit Kulkarni

डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्याची विकासाकडे वाटचाल

Patil_p

मांगोरहिल कोरोना उद्रेकामुळे गोवा हादरला

Omkar B

कृषी खात्याने राज्याला ‘आत्मनिर्भर’ बनवावे : मुख्यमंत्री

Patil_p

राज्यातील खाणी लवकरच सुरु करणार

Patil_p
error: Content is protected !!