तरुण भारत

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / पुणे : 


महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. या कोरोनाचा वाढता प्रसार रोकण्यासाठी सरकारने कडक नियमावली लागू केली आहे. यामध्ये सार्वजनिक कार्यक्रमासह लग्न सोहळ्यांसाठी नियमावली ठरवून दिली आहे. मात्र, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियमावली पायदळी तुडवण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरू झाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. माजी खासदार महाडिक यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पुण्यात कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या सोहोळ्यात कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. तसेच हजारांहून अधिक नागरिक विवाह समारंभात सहभागी झाले होते. या सोहोळ्यात अनेक नेत्यांनीही हजेरी लावली होती. मात्र, समारंभादरम्यान सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात आले नाही. याप्रकरणी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी ही माहिती दिली. 


माजी खासदार धनंजय महाडिक, लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि मॅनेजर निरुपल केदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोल्हापूर येथील माजी खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव पृथ्वीराज आणि वैष्णवी यांचा विवाह सोहळा हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स येथे पार पडला.

या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार वंदना चव्हाण यांच्यासह उद्योगपती, क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवाह सोहळ्यास हजेरी लावली होती. 


या विवाह सोहळ्यामध्ये शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियमांचे पालन केल्याचे दिसून आले नाही. तर 200 हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. त्याचबरोबर बहुतांश नागरिकांनी मास्क देखील घातले नव्हते. तसेच सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहण्यास मिळाले. लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर हडपसर पोलिसांनी धनंजय महाडिक यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

सातारा विकास आघाडीतच रणकंदन

Patil_p

खरीप हंगामासाठी खते व बि-बियांणाची पुरेशी उपलब्धता : कृषिमंत्री भुसे

triratna

माजी कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

triratna

गुरुवर्य पतसंस्थेत 43 लाखांचा अपहार

Patil_p

तौत्के चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा

pradnya p

थकबाकीदारांचे होणार पाणी कनेक्शन कट

Patil_p
error: Content is protected !!