तरुण भारत

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : 


महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. औरंगाबादमध्ये देखील गेल्या आठवड्यापासून प्रतिदिन रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यातच आता औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. 

Advertisements


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, सर्वांना माझा नमस्कार, माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तीन दिवसांपूर्वी माझ्यात कोरोनाची लक्षणे दिसली होती. त्यानंतर मी स्वतः ला वेगळे केले होते. सध्या कोरोनावर उपचार घेत असून, आपण सर्वांनी घरी सुरक्षित राहावे तसेच मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. 


दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे सरकारमधील अनेक बड्या नेत्यांना कोरोनची लागण झाली आहे. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बच्चू कडू, एकनाथ खडसे, राजेंद्र शिंगणे यांचा समावेश आहे.

Related Stories

गुंड मिंच्या गवळी खूनप्रकरणी एकास चार वर्ष सश्रम कारवास

Shankar_P

कोरोची गावाला दिलासा ; 6 जणांचे अहवाल निगेटिव्ह

triratna

नेपाळचा नवीन नकाशा कायम राहणार

datta jadhav

सांगली : नुकसान भरपाईचे विषय ‘सुपारी’ घेऊन

triratna

खासगी रूग्णालयांमध्ये रूग्णांवर नियमानुसार उपचार करा : जिल्हाधिकारी

triratna

कोरोना आपल्या बरोबर बराच काळ राहणार, कोणतीही चूक करू नका : WHO चा इशारा

prashant_c
error: Content is protected !!