तरुण भारत

गुळेली-कणकिरेला चक्रीवादळाचा तडाखा

दुपारी जोरदार पावसासह वादळी वारे : भीतीच्या आकांताने लोक घरातून पडले बाहेर : केवळ अर्ध्या तासात झाले होत्याचे नव्हते

उदय सावंत / गुळेली-कणकिरे

Advertisements

 सत्तरी तालुक्मयातील गुळेली पंचायतक्षेत्रातील गुळेली व कणकिंरे गावांमध्ये काल सोमवारी पडलेल्या अवेळी पावसामुळे व वादळी वाऱयामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा कणकिरेतील 16 घरांना जबरदस्त फटका बसला असून गुळेली व कणकिरेतील बगायतीचीही मोठय़ा प्रमाणात नुकसानी झालेली आहे. घरांच्या नुकसानीचा अंदाज 20 लाख रुपये असून बगायतीच्या नुकसानीचा आकडा जवळपास 15 लाख रुपये आहे. वाळपई अग्निशामक दलाची यंत्रणा रात्री उशिरापर्यंत घरांवरील झाडे दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत असल्याचे पहावयास मिळाले.

 काल सोमवारी सकाळपासून वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे संध्याकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गुळेली व कणकिरे भागामध्ये अचानक पाऊस पडला. त्याचबरोबर मोठय़ा प्रमाणात आलेल्या वादळी वाऱयामुळे मोठी नुकसानी झाली. केवळ अर्धा तास वादळी वारा वाहत होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रचंड प्रमाणात वाहणाऱया वाऱयामुळे काहीतरी घडणार अशा प्रकारची भीती नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाली होतीच. काही मिनिटांमध्येच चक्रीवादळाचा जबरदस्त फटका या भागाला बसला.

 कणकिरेतील 16 घरांची मोठी नुकसानी

 चक्रिवादळाचा कणकिरे गावाला अधिक फटका बसला. गावातील जवळपास सर्वच घरांना जबरदस्त फटका बसला. 16 घरांची मोठी नुकसानी झाली आहे. छप्परांचे पत्रे उडून गेले असून यामुळे घरगुती सामानाची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झालेली आहे. या भयानक वादळी वाऱयामुळे सुरू झालेली पडझड पाहून घाबरलेले लोक आपली सुटका करुन घेण्याच्या अनुषंगाने घरातून बाहेर पडले. घरांच्या नुकसानीचा अंदाज जवळपास वीस लाखांच्या आसपास असण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. यासंदर्भाची एकूण आकडेवारी सर्व घरांचा पंचनामा झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

 अग्निशामक यंत्रणेने घेतली धाव

 यासंदर्भात माहिती मिळताच वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेने धाव घेऊन ग्रामस्थांना मदतकार्य सुरु केले. घरांवर व अन्य ठिकाणी पडलेली भली मोठी झाडे दलाने दूर केली. रात्री उशिरापर्यंत सदर काम सुरू होते. निरीक्षक संतोष गावस यांनी  मोठय़ा प्रमाणात घरांची नुकसानी झाल्याचे स्पष्ट केले. काही काम शिल्लक राहिल्यास मंगळवारी सकाळपासून पुन्हा कामाला सुरुवात करण्यात येईल, असे संतोष गावस यांनी सांगितले.

कौले पडून अनिल पालकर जखमी

वादळामुळे छपरावरील कौले पडून अनिल पालकर हे जखमी झाले आहेत. त्यांच्या छातीवर जखम झाली आहे. 108 सेवेतून त्यांना वाळपई सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यामुळे संध्याकाळी उशिरा घरी पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सुत्राकडून प्राप्त झाली. सुदैवाने इतर कोणत्याही नागरिकांना इजा पोचली नाही. मात्र प्रसंगावधान राखून नागरिकांनी आपला बचाव केल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले.

कृषी बागायतीची प्रंचड नुकसाना

चक्रीवादळामुळे गुळेली व कणककिरे भागातील बागायतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. जास्त फटका प्रभाकर गावकर यांना बसला असून त्यांची 60 सुपारीची झाडे व वीस 20 माड यांची नुकसानी झाल्याची माहिती विभागीय कृषि अधिकारी विश्वनाथ गावस यांनी दिली. गुळेली भागातील सावंत, नाबर व देसाई कुटुंबांच्या बागायतीची नुकसानी झालेली आहे. अनेक जणांच्या बागायती या चक्रीवादळात सापडल्यामुळे नुकसान झाले असून यासंदर्भाचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. विश्वनाथ गवस यांच्या अंदाजानुसार जवळपास 15 लाखापेक्षा जास्त नुकसान झाले असून निश्चित आकडा अजूनपर्यंत स्पष्ट झालेला नाही. मात्र ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांनी मंगळवारी ताबडतोब विभागीय कृषी कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

चक्रीवादळामुळे गावाला जबरदस्त फटका : लवू गावकर

 या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी पंचायत सभासद लवू गावकर यांनी सांगितले की चक्रीवादळामुळे गावाला जबरदस्त फटका बसलेला आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून सरकारने गंभीर दखल घेत या भागाकडे कटाक्षाने लक्ष देऊन नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी केली आहे. ही नैसर्गिक पडझड असून यामुळे सरकारने या भागाकडे दुर्लक्ष करू नये, असे ते म्हणाले.

घरांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान : अनंत गावस

 अग्निशामक दलाची यंत्रणा ताबडतोब घटनास्थळी दाखल झाली. सध्यातरी अनेक घरावरील अडचणी दूर करण्यात आलेल्या आहेत. अनेक घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे. घरातल्या सामानाचीही हानी झालेली आहे. रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यात आली असून रस्ता मोकळा केला आहे. मात्र घरांची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाल्यामुळे नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे हवालदार अनंत गावस यांनी सांगितले.

कृषी बागायतीची 15 लांखाची नुकसानी : विश्वनाथ गावस

चक्रीवादळामुळे गुळेली व कणकिंरे भागाला जबरदस्त फटका बसला आहे. बागायतीचे नुकसान झालेले आहे. खासकरून केळी, नारळ, सुपारी यांची प्रचंड प्रमाणात नुकसानी झालेली आहे. प्रभाकर गावकर यांची जास्त प्रमाणात नुकसानी झाली असून यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांना आपल्या नुकसान भरपाईची कागदपत्रे विभागीय कृषी कार्यालयात सादर करण्याची विनंती करण्यात आल्याचे विश्वनाथ गावस यांनी यावेळी स्पष्ट केले.

बागायतीची जास्त नुकसानी : प्रभाकर गावकर

आपल्या बागायतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रभाकर गावकर यांनी सांगितले. जवळपास 60 सुपारीची झाडे व 20 पेक्षा जास्त नारळाची झाडे जमिनदोस्त झालेली आहेत. केळी बागायत मोठय़ा प्रमाणात नुकसानीत सापडलेली आहे. यामुळे आपल्याला जवळपास पाच लाखापेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया प्रभाकर गावकर यांनी व्यक्त केली.

सरकारने कटाक्षाने लक्ष द्यावे : नितेश गावडे

गुळेली-कणकिंरे पंचायत क्षेत्रामध्ये घडलेल्या नैसर्गिक पडझडीची सरकारने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी उपसरपंच नितेश गावडे यांनी केली आहे. आपण या भागाचा दौरा केला असून कृषी अधिकारी व मामलेदार कार्यालयाच्या यंत्रणेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. अग्निशामक दलाच्या यंत्रणेने चांगल्या प्रकारचे कार्य केले असे यावेळी नितेश गावडे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

सुर्याकांत गावकर याना गोवा राज्य जैवविविधता संवर्धन पुरस्कार 2020 जाहीर

Omkar B

आमदार अपात्रता प्रकरणी सभापतींकडून उद्या सुनावणी

Patil_p

आयआयटीमुळे गुळेली जागतिक नकाशावर झळकणार

Omkar B

चिकन लॉलीपॉपमध्ये चक्क किडे

Amit Kulkarni

फोंडय़ात लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद

Amit Kulkarni

कोरोना : 6 बळी, 254 बाधित

Amit Kulkarni
error: Content is protected !!