बेळगाव : श्री चषक खडक गल्ली आयोजित श्री चषक निमंत्रितांच्या आंतरजिल्हा टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स ग्रामीण, पी. एम. स्पोर्ट्स पीरनवाडी, जिजामाता स्पोर्ट्स व बालाजी स्पोर्ट्स हालगा संघानी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. संतोष सुळगे पाटील, नामदेव पाटील, ओमकार पाटील, उमेशा बेळगुचे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्य पहिल्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स ग्रामीणने 8 षटकात 4 बाद 93 धावा केल्या. त्यात सुशांत जाधवने 27 तर संतोष सुळगे पाटीलने 26 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंडियन बॉईज हिंडलगाने 8 षटकात 9 बाद 87 धावाच केल्या. त्यात शंकर होसमनी, अतुलराज पाटील यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. मराठातर्फे संतोष सुळगे पाटीलने 4 गडी बाद केले. दुसऱया सामन्यात पी. एम. पिरनवाडीने 8 षटकात 6 बाद 73 धावा केल्या. त्याला उत्तर देताना आरसी स्पोर्ट्सने 8 षटकात 7 बाद 69 धावा केल्या. तिसऱया सामन्यात जगदंबा स्पोर्ट्स संघाने 8 षटकात 5 बाद 88 धावा केल्या. त्यात ओमकारने 44 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल डीपीएल संघाने 8 षटकात 8 बाद 54 धावाच केल्या. चौथ्या सामन्यात बालाजी स्पोर्ट्स संघाने 8 षटकात 2 बाद 84 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल डेपो मास्टरने 8 षटकात 5 बाद 65 धावाच केल्या.


previous post