तरुण भारत

शांताईतर्फे शंकर पाटील यांचा सत्कार

कोरोनाकाळातील सेवेबद्दल घेतली दखल : आश्रमातील कार्यरत महिलांचाही गौरव

प्रतिनिधी / बेळगाव

शांताई वृद्धाश्रमाच्यावतीने कोविड काळात समाजासाठी सेवा करत असलेले शंकर पाटील आणि त्यांच्या सहकाऱयांचा शांताईच्यावतीने प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन रविवारी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला शांताईचे आधारस्तंभ शांताई भरमा पाटील, अध्यक्ष विजय पाटील, उद्योजक विष्णू रायबागी, भगवान वाळवेकर, अनुप जवळकर, मदनकुमार भैरप्पण्णावर, व्यवस्थापक नागेश चौगुले उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते शंकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

गेल्या 2 महिन्यांमध्ये शंकर व त्यांचे मित्रमंडळ यांनी गणाचारी गल्ली येथे फ्लू क्लिनिक चालविले. कोरोनामुळे मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कारही केले. कोरोना रुग्णांसाठी भोजन व नाष्टय़ाची सोय केली. ऑक्सिजन सिलिंडर पुरविले, अशी माहिती विजय मोरे यांनी दिली. विजय पाटील, राजश्री रायबागी यांचा वाढदिवसाबद्दल सत्कार केला. नवदाम्पत्य राजश्री-महावीर रायबागी, श्रुती व दर्शन रायकर, धनश्री व कुबेर रायबागी यांचे आश्रमातील आजींच्यावतीने औक्षण करून आशीर्वाद देण्यात आला. आश्रमात निःस्वार्थी सेवा करणाऱया रेखा बाळेकुंद्री, रेखा कणबरकर, बाळव्वा मुलीमनी, मलप्रभा कणबरकर यांना दोन महिन्यांचे रेशन देऊन सत्कार केला. यावेळी बाळू पाटील यांचे भजन झाले. याप्रसंगी संगीता संजय पाटील, मारीमा विजय मोरे, लता काळे, शंभू शित्रे, महंमद कुन्नीभावी, संतोष ममदापूर, राजेंद्र बन्सूर, गंगाधर पाटील, शिवानी मुचंडी, ऋतुजा पवार, शंकर नावगेकर, रवी साळुंके, दीपानंद पाटील, धनश्री पाटील, दत्ता घोरपडे, दीपक, प्रकाश यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. ऍलन मोरे यांनी आभार मानले.

Related Stories

किणयेजवळ ट्रक लुटण्याचा प्रयत्न

Omkar B

मनपा विभागीय महसूल कार्यालयातील कामकाज ठप्प

Patil_p

आज शेतकरी संघटनांचा ‘बेळगाव बंद’

Patil_p

अवचारहट्टी-देवगणहट्टी येथे घरफोडय़ा

Patil_p

कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं.अध्यक्षपदी संध्या चौगुले

Amit Kulkarni

जितो बेळगावच्या अध्यक्षपदी सुनील कटारिया

Patil_p
error: Content is protected !!