तरुण भारत

कॅन्टोन्मेंटच्या खजिन्यात ठणठणाट

केंद्र शासनाकडून निधी नाही : कर्मचाऱयांचे वेतन होणार विलंबाने

प्रतिनिधी / बेळगाव

केंद्र शासनाकडून निधी मिळत नसल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. विद्युत बिल, पाणीपट्टी थकली असून, आता कॅन्टोन्मेंट बोर्डच्या खजिन्यात ठणठणाट असल्याने कर्मचाऱयांचे वेतन देण्यासही निधी नाही. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कर्मचाऱयांचे वेतन विलंबाने करण्यात येणार असल्याची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कॅन्टोन्मेंटला केंद्र शासनाकडून निधी मंजूर करण्यात येतो. मात्र, मागील चार वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डना निधी देण्यात आला नाही. त्यामुळे एसएफसी अनुदान व राज्य शासनाकडून मिळणाऱया अनुदानामधून विकासकामे राबविण्यात येत आहेत. वर्षभरात केंद्र शासनाकडून केवळ 15 व्या वित्त आयोग अनुदानातून निधी मंजूर करण्यात आला. अन्य निधी दिला नसल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डची आर्थिक स्थिती बिघडली आहे. काही प्रस्ताव स्मार्ट सिटी आणि महापालिका तसेच आमदार निधीतून राबविण्यात येत आहेत. पण अन्य विकासकामे राबविण्यासाठी कॅन्टोन्मेंटकडे निधीच उपलब्ध नाही. विद्युत बिल भरण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येत होते. मात्र, मागील चार वर्षांपासून हे अनुदानदेखील मिळाले नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डकडे निधी नसल्याने सुमारे 2 कोटी विद्युत बिल थकले आहे. पाणी पुरवठा मंडळाचे 2 कोटीचे बिल शिल्लक आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या खजिन्यात ठणठणाट असल्याने आता मनपा कर्मचाऱयांचे वेतन देणेदेखील मुश्कील बनले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कार्यालयात 210 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. पण या कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठीदेखील निधी नाही. लष्कराकडून मिलिटरी कंझर्वशी फंड म्हणून निधी देण्यात येतो. मात्र, तो देखील अद्याप मिळाला नाही. सदर बिल मंजूर झाल्यानंतर कर्मचाऱयांचे वेतन देण्यात येणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कर्मचाऱयांचे वेतन महिना अखेर देण्यात येते. मात्र, निधी उपलब्ध नसल्याने कर्मचाऱयांचे वेतन विलंबाने करण्यात येणार असल्याची नोटीस कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कर्मचाऱयांना वेतनाकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Related Stories

येळ्ळूर शेतकरी विकास कृषी पत्तीन सोसायटीचे कार्य कौतुकास्पद

Amit Kulkarni

निपाणीत नगराध्यक्ष निवडणुकीला खो

Patil_p

उद्याच्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा

Amit Kulkarni

रेल्वे ओव्हरब्रिजवर वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या

Patil_p

शहरात प्रत्येक रस्त्यावर पार्किंग

Patil_p

शॉटकॉन कराटे डू स्पोर्ट्स अकॅडमीचे सुयश

Amit Kulkarni
error: Content is protected !!