तरुण भारत

तालुक्यात विविध ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा

ग्रा.पं. नूतन सदस्यांचा सत्कार-पोवाडय़ांचा कार्यक्रम : सर्वत्र भगवेमय वातावरण : कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह : जय भवानी जय शिवाजी…च्या घोषणांनी परिसर दणाणला

प्रतिनिधी / बेळगाव

बोडकेनहट्टी येथे शिवजयंती साजरी

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने बोडकेनहट्टी येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठय़ा उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्राम पंचायत नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी पोवाडय़ाचा कार्यक्रम पार पडला.

छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाचे पूजन हंदिगनूर ग्रा.पं.अध्यक्ष सुरेश जाधव, नागेश नाईक, व्हळाप्पा भांदुर्गे व नागेंद्र भांदुर्गे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. वाल्मिकी मूर्ती पूजन जोतिबा तवनोजी, चन्नाप्पा नाईक, यशवंत तवनोजी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पोवाडा व ग्राम पंचायत नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवेंद्र भांदुर्गे व प्रमुख पाहुणे म्हणून चन्नाप्पा नाईक, यशवंत तवनोजी होते.

ग्रा.पं.अध्यक्ष सुरेश जाधव यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष संतोष आवडाणे यांनी, नागेश नाईक यांचा सत्कार दशरथ तवनोजी, जोतिबा तवनोजी यांचा बसवाणी हुद्दार यांनी केला. याचबरोबर शिक्षक जी. एस. पाटील, एम. डी. जाधव व व्ही. एम. हुद्दार यांचाही सत्कार करण्यात आला. व्हळाप्पा भांदुर्गे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी गावातील कराटेपटूंचाही सत्कार करण्यात आला. विलास कारेकर व त्यांच्या सहकाऱयांनी यावेळी छ. शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावरील पोवाडा सादर केला. प्रास्ताविक एम. डी. जाधव यांनी केले. सूत्रसंचालन जी. एस. पाटील यांनी तर आभार व्ही. एम. हुद्दार यांनी मानले. यावेळी सुजय जाधव, वेदांत जाधव, रोहित तवनोजी, रोहन वर्पे, संकेत तवनोजी, शेखर बसर्गे, धनराज पाटील, ओंकार तवनोजी, सुजल प. जाधव, जितेश तवनोजी यासह कराटे प्रशिक्षक भरमाणी पाटील यांचा विशेष कार्यक्रम झाला.

यावेळी कल्लाप्पा तवनोजी, भरमाणी पाटील, कृष्णा धुळे, खाचू तवनोजी, लगमा नाईक, बाबू आवडाणे, मारुती तवनोजी, संजय शहापूरकर, परशराम बसर्गे, कल्लाप्पा जाधव, मंडळाचे अध्यक्ष संतोष आवडाणे, उपाध्यक्ष दशराथ तवनोजी, सेपेटरी महेश भांदुर्गे, खजिनदार बसवाणी हुद्दार, मंडळाचे सदस्य मल्हारी राजुकर, महेश तवनोजी, परशराम हुद्दार, अमोल तवनोजी, दत्तात्रय पाटील, युवराज जाधव, किरण अस्वलकर याचबरोबर गावातील मंडळे, महिला मंडळे व ग्रामस्थ उपस्थित होते. 

कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड, यमनापूर परिसर

कंग्राळी बुद्रुक : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषात कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड, यमनापूर, शाहूनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठय़ा उत्साहात शुक्रवारी साजरी करण्यात आली.

ग्राम पंचायत व ग्रामस्थ

कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये व गावच्या मध्यभागी असलेल्या चौकामध्ये ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्यावतीने संयुक्तरीत्या शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी महिला ग्रा. पं. सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शिवाजी महाराज पुतळय़ाचे पूजन ग्रा. पं. सदस्य बंदेनवाज सय्यद यांच्या हस्ते, शिवपुतळय़ाला पुष्पहार अर्पण ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रा. पं. उपाध्यक्ष अनिल पावशे यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, यल्लोजी पाटील, उमेश पाटील, दादासाहेब भदरगडे, नवनाथ पुजारी, बाबू दोडमनी, सदस्या भारता पाटील, सुचिता कोळी, मेनका कोरडे, दीपा पम्मार, वंदना चव्हाण, योगीता पठाणे, फकिरव्वा बेळगावी, सुवर्णा लकन्नावर, सेक्रेटरी सुनंदा एन. यांच्यासह शिवप्रेमी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रा. पं. कर्मचारी यल्लाप्पा पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

राजर्षि शाहू दूध डेअरी

दीपप्रज्वलन संस्थेचे चेअरमन वाय. बी. चव्हाण, संस्थापक शंकर चव्हाण, संचालक सुभाष चिखलकर, सदानंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पूजन संचालक किसन हुरुडे यांच्या हस्ते, राजर्षि शाहू महाराज फोटो पूजन संचालक मल्लाप्पा अष्टेकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीफळ सेक्रेटरी मनोहर भैरटकर यांनी वाढविले. यावेळी संस्थेचे दूध संकलन शेतकरी व शिवप्रेमी उपस्थित होते. संचालक सदानंद चव्हाण यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

मोरया ग्रूप बाहेर गल्ली

बाल तरुण युवक मंडळ व मोरया ग्रूपच्यावतीने शुक्रवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रा. पं. सदस्य यल्लोजी पाटील यांच्या हस्ते मूर्ती पूजन करण्यात आले. पाळणा पूजन भरत पाटील यांच्या हस्ते तर श्रीफळ हुवाप्पा पाटील यांच्या हस्ते वाढविण्यात आले.

यावेळी नागेश पाटील, राजू कागणकर, कल्लाप्पा पाटील, परशराम निलजकर, महेश अष्टेकर, भाऊराव कडोलकर, परशराम पाटील, स्वप्नील पाटील, पुंडलिक पाटील, मनोहर पाटील, मारुती कागणकर, किरण पाटीलसह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

बाल संभाजी युवक मंडळ चव्हाट गल्ली

राजू पाटील, मधू पाटील, यशवंत हर्जे, किरण पाटील आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गजानन हर्जे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हरीष निलजकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.

यावेळी प्रवीण अष्टेकर, सोहन हुरुडे, हिरामणी पाटीलसह बाल संभाजी युवक मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

हिंडलग्यात शिवजयंती

हिंडलगा : हिंडलगा ग्रामस्थांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र भगवेमय वातावरण आणि शिवरायांच्या जयघोषात शिवप्रेमींनी परिसर दणाणून सोडला होता.

यानिमित्त श्रीराम सेना व हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार कोकितकर यांच्या हस्ते रामदेव गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन करून अभिषेक घालण्यात आला. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

यावेळी निखील कडोलकर, राकेश मुतगेकर, रमेश पावशे, व्यंकटेश देवगेकर, कुणाल कोकितकर, प्रवीण देवगेकर, विष्णू कडोलकर, दयानंद देवगेकर, संदीप किल्लेकर, सुरज नाईक, स्वप्निल पावशे, रवींद्र कुप्पेकर, नागेश किल्लेकर, आनंद साळुंखे यांच्यासह शिवप्रेमी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुतगा न्यू इंग्लिश स्कूल

सांबराः मुतगे येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल येथे शिवजयंती उत्सव मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम. वाय. केदार होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी इयत्ता नववीची विद्यार्थिनी ऋतू शिंदे हिने उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकातून उद्देश व महत्त्व पटवून दिले. यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांची भाषणे झाली, स्वप्ना सुणगार, विनायक सुणगार, वैष्णवी पाटील, स्वाती जाधव व राशी धर्मोजी यांनी आपल्या भाषणातून शिवरायांच्या गोष्टी, यशोगाथा मांडल्या.

शाळेचे सहशिक्षक टी. डी. कुराडे यांनी शाहीस्तेखानाची फजिती हा शिवरायांच्या पराक्रमातील गनिमीकावाचा प्रसंग सांगितला. कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांनी केल्याने त्यांचे विशेष कौतूक करण्यात आले. यानंतर अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनुजा पाटील हिने केले तर आभार कु. लक्ष्मी रावळ हिने मानले. याप्रसंगी एम. बी. लगाडे, बी. व्ही. गुडगेनेट्टी, जी. बी. बेडका, आर. ए. कानणावर, एस. के. मोरे, एस. एस. पाटील, के. एल. पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.

मच्छे शिवतेज युवा संघटना

किणये : मच्छे येथील शिवतेज युवा संघटना व ग्रामस्थांच्यावतीने शुक्रवारी शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी लक्ष्मी गल्ली व लोहार गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली.

शिवजयंतीनिमित्त युवकांसाठी वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम सायंकाळी सप्तपदी मंगल कार्यालय, मच्छे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते प्रा. मायाप्पा पाटील हे होते. त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज व आजचा तरुण’ या विषयावर मार्गदर्शन केले. महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित विविध प्रसंग सांगून आजच्या तरुणांनी स्वतःसह समाजाचा विकास करण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. तसेच पुस्तक व विविध ग्रंथांचे वाचन करण्याची गरज आहे, असे सांगितले. कार्यक्रमाला संतोष जैनोजी, कृष्णा अनगोळकर, कृष्णा सनदी, पद्मराज पाटील, सुहास गोरल, सागर जैनोजी, सरोज सनदी, संदीप वाघोजी, विक्रांत सनदी, पवन देसाई, अरुण भेकणे, बजरंग धामणेकर आदींसह तरुण-तरुणी उपस्थित होते.

कुद्रेमनी येथे विविध संघटनांतर्फे शिवजयंती साजरी

कुद्रेमनी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाचे अनुकरण करणे महत्त्वाचे आहे. त्यांची प्रेरणा घेऊन आजच्या तरुण युवकांनी चांगला समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावा, व जीवनात यशस्वी व्हावे, असे विचार ग्राम पंचायतीचे माजी सदस्य नागेश राजगोळकर यांनी व्यक्त केले. नुकताच विविध युवक संघटनांच्यावतीने कुद्रेमनी गावात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रास्ताविक स्वागत रुक्माण्णा कागणकर यांनी केले. ग्राम पंचायतचे उपाध्यक्ष विनायक नारायण पाटील यांच्या हस्ते गावच्या मुख्य चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन झाले. यावेळी नितेश पाटील, सौरव मुरकुटे, संजय बिजगर्णीकर, भरत पाटील, सुनील तुर्केवाडकर, परशराम तुर्केवाडकर, कार्तिक पाटील, वैष्णव काकतकर, संदेश पाटील, सुरेश पाटील, निखिल पाटील, संतोष धामणेकर, ज्ञानेश्वर शिवणगेकर, संजय बिजगर्णीकर आदींसह विविध संघटनांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवावर्ग मोठय़ा संख्येने हजर होते. परशराम तुर्केवाडकर यांनी आभार मानले.

बलभीम युवक संघ

कुद्रेमनी गावातील बलभीम युवक संघाच्यावतीने बलभीम वाचनालयाच्या कार्यालयात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक एम. बी. गुरव, यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यानंतर ईश्वर क. गुरव, गावडू पाटील, ग्रा. पं. सदस्य शांताराम पाटील, शिवाजी मुरकुटे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. जी. जी. पाटील, शांताराम गुरव यांनी शिवचरित्राविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी संघाचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ग्रा. पं. माजी सदस्य नागेश राजगोळकर यांनी  आभार मानले.

कुद्रेमनी हायस्कूल

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ कुद्रेमनी हायस्कूलमध्ये शिवजयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. एम. पी. गोवेकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. मुख्याध्यापक पी. एच. पाटील, शाळा सुधारणा मंडळ सदस्य एम. पी. गुरव, जे. एस. पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. यानंतर जे. पी. अगसीमनी, गावडे यांनी शिवरायांच्या आदर्शाबद्दल मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जोतिबा खन्नूरकर, जोतिबा पाटील, बाळू चौगुले, आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. एम. ओ. कोकीतकर यांनी आभार मानले.

Related Stories

हेस्कॉमच्या कारभारामध्ये सुधारणा करा

Patil_p

कोगनोळी नाक्यावरील चार पोलिसांना कोरोना

Patil_p

मूलभूत सुविधांपासून वंचित विमुक्त भटका समाज

Patil_p

उद्योग खात्रीत काम करणाऱया कामगाराची दोन बोटे निकामी

Patil_p

ऑनलाईन राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेत स्नीता लंबोर प्रथम

datta jadhav

सिग्नेचर क्लब, सीसीआय ब संघ विजयी

Amit Kulkarni
error: Content is protected !!