तरुण भारत

दिल्लीत 128 नवे कोरोना रुग्ण; 157 जणांना डिस्चार्ज

  • आतापर्यंत 6.26 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त! 


ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 128 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 38 हजार 028 वर पोहचली आहे. यामधील 1,041 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 157 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 26 हजार 086 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,901 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 20 लाख 14 हजार 182 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 31,234 आरटीपीसीआर टेस्ट आणि 11,008 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत. 


सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 5.31 % आणि मृत्यू दराचे प्रमाण 1.71%आहे. तर 637 झोन आणि 130 कंट्रोल रूम आहेत. 

Related Stories

सीआरपीएफच्या सुरक्षा यंत्रणेत सुधारणा

Patil_p

धूवास्त्र क्षेपणास्त्रची चाचणी यशस्वी

Patil_p

भाजपकडून पश्चिम बंगाल विधानसभेची तयारी; शाह, नड्डा करणार दर महिन्याला दौरा

datta jadhav

कोरोनाचा उद्रेक : देशात गेल्या 24 तासात 45,720 नवे रुग्ण; एकूण संख्या 12 लाख पार

pradnya p

नोव्हेंबरपर्यंत गरिबांना मोफत गहू, डाळ देणार; हरियाणा सरकारचा निर्णय

pradnya p

यूपीएससी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य

datta jadhav
error: Content is protected !!